एक्स्प्लोर

Womens T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार फलंदाज स्मृती मंधानाला दुखापत

ICC Womens T20 World Cup 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाला 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी महिला संघाविरुद्ध ICC महिला T20 विश्वचषक 2023 मधील पहिला सामना खेळायचा आहे.

Smriti Mandhana injured : भारतीय महिला क्रिकेट संघ (Womens Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे, जिथं  आजपासून (10 फेब्रुवारी) ICC महिला T20 विश्वचषक सुरू होत आहे. भारतीय महिला संघाला (Womens Cricket Team) 12 फेब्रुवारीला पाकिस्तानी महिला संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. याआधी टीम इंडियाची (Team India) उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दुखापतीमुळे सामन्याबाहेर होऊ शकते. भारत सलामीचा सामना पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) 12 फेब्रुवारी रोजी खेळणार आहे. दरम्यान विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला आपल्या मोहिमेची सुरुवात धमाकेदारपणे करायची आहे. अशा परिस्थितीत स्मृती मंधाना या सामन्यातून बाहेर राहिल्यास संघाच्या फलंदाजीवर मोठा दबाव निर्माण होऊ शकतो. मंधानाने 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही भाग घेतला नव्हता. स्मृतीला ही दुखापत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान झाली होती.

याशिवाय भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan Cricket) सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यानंतर ती अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकलेली नाही.

कशी आहे टीम इंडिया?

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड. 

T20 विश्वचषकात भारताचे सामने कधी-कधी होणार आहेत?

  • 12 फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
  • 15 फेब्रुवारी: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)
  • 18 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
  • 20 फेब्रुवारी: भारत विरुद्ध आयर्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)

कधी, कुठे पाहाल विश्वचषकाचे सामना?

भारतीय महिला संघ पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्यानी विश्वचषकाची (WC 2023) सुरुवात करणार आहेत. हा सामना 12 फेब्रुवारीला केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दरमयान हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget