(Source: Poll of Polls)
Smriti Mandhana : भारतासाठी 100 वा टी20 सामना खेळल्यानंतर स्मृती मानधना भावूक, म्हणाली...
IND vs THAI : भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने आज आशिया कप स्पर्धेत खेळताना आपला 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला.
Smriti Mandhana 100th T20I Match : भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) हीने आज आपला 100 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. महिला आशिया चषकात (Womens Asia Cup 2022) भारत विरुद्ध थायलंड (IND vs THAI) या सामन्यात भारताचं नेतृत्त्व स्मृतीने सांभाळला असून हाच तिचा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. दरम्यान याबद्दल बोलताना स्मृती म्हणाली, “भारतासाठी खेळणं आणि त्यात 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणं ही एक खास भावना आहे. माझ्यासोबतच्या सहखेळाडूंनी हे आणखी विशेष केलं. थायलंडनं स्पर्धेत चांगलं क्रिकेट खेळलं. आम्ही खेळण्यासाठी उत्सुक होतो. आज आमच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली."
'सेमीफायनलसाठी आम्ही उत्सुक'
आजच्या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. भारतीय संघाने साखळी टप्प्यातील 6 सामन्यांतील 5 सामने जिंकत 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. सोबतच उपांत्य फेरीत प्रवेशही केला आहे. दरम्यान आजच्या सामन्यात स्मृतीपर्यंत फलंदाजी आलीच नाही, त्यामुळे सामन्यानंतर बोलताना ती म्हणाला, ''आज सुरुवातीच्या फलंदाजांनीच काम पूर्ण केलं. आता दोन दिवसांनी होणाऱ्या सेमीफायनल सामन्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही त्यासाठी कसून सराव करत आहोत.''
सामन्याचा लेखा-जोखा
शेल्हेट आंतराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं थायलंडला 9 विकेट्सनी पराभूत केलं. भारताने नाणेफेक जिंकून थायलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलवलं. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय अगदी योग्य असल्याचं दाखवून देत सुरुवातीपासूनच थायलंडच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. थायलंडच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कोंचरोंकाईने सर्वाधिक 12 धावा केल्या. संपूर्ण संघ 15.1 षटकात 37 धावांत सर्वबाद झाला. यावेळी भारताकडून स्नेह राणाने 9 धावांत 3 बळी घेतले. दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाडने 2-2 तर मेघना सिंहला एक विकेट मिळाली. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघाने सहज केला. शेफाली वर्मा (8), एस मेघना (20) आणि पूजा वस्त्राकर (12) यांनी हे लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला.
हे देखील वाचा-