Shreyas Iyer ODI Record : वेस्ट इंडीजविरुद्ध अर्धशतक ठोकताच श्रेयसचा खास विक्रम, धवन-कोहलीच्या पंगतीत स्थान
Shreyas Iyer : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यात युवा भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकत 54 धावा केल्या, ज्यासोबत त्याने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
IND vs WI : भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याने सामन्यात 54 धावा करत दमदार अर्धशतक ठोकलं, पण याच वेळी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा देखील पार केला असून हा टप्पा वेगवान पद्धतीने पार करणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. याआधी कोहली आणि धवन यांनी 24 डावात हा टप्पा पार केला होता. ज्यानंतर आता श्रेयस अय्यरने 25 डावांत हा टप्पा पर करत या दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यामुळे भारतीय फलंदाज प्रथम मैदानात आले. यावेळी धवन आणि गिलने उत्तम सुरुवात केली. पण दोघेही बाद झाल्यावर श्रेयसने डाव सावरला. तो 54 धावा करुन बाद झाला खऱा पण याचवेळी त्याने 1000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. त्याने ही कमाल 25 डावांत केली आहे. सध्या श्रेयसच्या नावावर 25 डावांत 1001 धावा आहेत.
सामन्यात भारत विजयी
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी विजयी झाला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. सामन्यात वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली, पण केवळ 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडीज सामना जिंकू शकले नाहीत. आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.
हे देखील वाचा-
- Team India : शिखर धवन कर्णधार होताच टीम इंडियाचा नकोसा विक्रम, श्रीलंकेच्या 5 वर्षे जुन्या रेकॉर्डची बरोबरी
- Yonex Taipei Open 2022: भारताची मिश्र दुहेरी जोडी तनीषा क्रास्टो-इशान भटनागर यांचं आव्हान संपुष्टात!
- Commonwealth Games 2022: कामनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार- स्मृती मानधना