(Source: Poll of Polls)
Commonwealth Games 2022: कामनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार- स्मृती मानधना
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (Indian Olympic Association) एकूण 322 सदस्यांची घोषणा केलीय. ज्यात 215 खेळाडू आणि 107 अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे. कामनवेल्थ क्रिडा स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघाचा समावेश केलाय. या स्पर्धेत भारतीय संघ 29 जुलै रोजी ऑस्ट्रेलियाशी पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी भारताची उप-कर्णधार स्मृती मानधनानं कामनवेल्थ गेम्समध्ये टीम इंडियाचा सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार असेल, असं म्हणत या स्पर्धेतील आपली भूमिका स्पष्ट केलीय.
स्मृती मानधना काय म्हणाली?
"कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ उत्साहित आहेत. जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकतो आणि कानावर देशाचं राष्ट्रगीत पडतं, त्यावेळी काय भावाना असते? हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. यामुळं या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या हेतूनचं आम्ही मैदानात उतरू."
ट्वीट-
भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)
तारीख | सामने | ठिकाण | वेळ |
29 जुले 2022 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 11:00 am– 2:30 pm |
31 जुले 2022 | भारत विरुद्ध पाकिस्तान | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 11:00 am– 2:30 pm |
03 ऑगस्ट 2022 | भारत विरुद्ध बारबाडोस | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 6:00 pm – 9:30 pm |
06 ऑगस्ट 2022 | उपांत्य फेरी 1 | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 11:00 am– 2:30 pm |
06 ऑगस्ट 2022 | उपांत्य फेरी 2 | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 6:00 pm – 9:30 pm |
07 ऑगस्ट 2022 | कांस्यपदक सामना | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 10:00 am– 1:30 pm |
07 ऑगस्ट 2022 | सुवर्णपदक सामना | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 5:00 pm – 8:30 pm |
कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस. मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), यास्तिका भाटिया (विकेटकिपर), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमाह रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.
हे देखील वाचा-
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!
- World Athletics Championships 2022: ट्रिपल जंपमध्ये अंतिम फेरी गाठून एल्डहोस पॉलनं रचला इतिहास!