Shreyas Iyer : अय्यरमध्ये अचानक घुसला सुनील नरेनचा आत्मा, व्हिडिओवर पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाला... हे काय?
बुची बाबू टूर्नामेंट सुरू झाली असून त्यात अनेक स्टार भारतीय खेळाडू खेळताना दिसत आहेत.
Shreyas Iyer Viral Video : बुची बाबू टूर्नामेंट सुरू झाली असून त्यात अनेक स्टार भारतीय खेळाडू खेळताना दिसत आहेत. मंगळवारी मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरने असे काही केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान अय्यर अचानक सुनील नरेनच्या अवतारात दिसला.
श्रेयस अय्यरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या गोलंदाजीची जास्त चर्चा होत आहे. बुची बाबू स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान अय्यरने चेंडू हातात घेतला. अय्यर पहिल्यांदाच गोलंदाजी करताना दिसला होता, पण त्याची ॲक्शन हुबेहूब सुनील नरेनसारखी होती, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. त्याने सेम नरेन सारखे पूर्ण षटक टाकले.
अय्यरच्या बॉलिंग रनअप आणि रिलीज ॲक्शनमध्ये सुनील नरेनची झलक दिसत असल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. सुनील नरेन आणि श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससोबत ड्रेसिंग रूम शेअर करतात. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी अय्यर शेवटचे षटक टाकण्यासाठी आला. जिथे, त्याने पहिल्या 5 चेंडूंवर फक्त एक धाव दिली, परंतु नंतर विरोधी फलंदाज सोनू यादवने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, त्यामुळे त्याच्या षटकात केवळ 6 धावा गेल्या.
Shreyas Iyer is bowling and that too in the style of Sunil Narine. 🥵❤️🔥 pic.twitter.com/L7QSE0Xqt8
— Pick-up Shot (@96ShreyasIyer) August 27, 2024
श्रेयस अय्यरसोबत गौतम गंभीर
गौतम गंभीर जेव्हापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे, तेव्हापासून त्याने ठरवले आहे की भारतीय संघाच्या फलंदाजांनीही गोलंदाजी करावी. श्रीलंकेसोबत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा गोलंदाजी करताना दिसला होता. त्याच वेळी, आता इतर क्रिकेटर्स देखील गोलंदाजी करत आहेत, जेणेकरून ते टीम इंडियाचा भाग बनू शकतील.
आता दुलीप ट्रॉफीची पहिली फेरी पाच सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये श्रेयस अय्यर टीम डी चे नेतृत्व करताना दिसणार आहे.
हे ही वाचा -
Zaheer Khan : ठरलं तर मग! आज गौतम गंभीरची जागा घेणार मुंबईचा पठ्ठ्या; फ्रँचायझी करणार घोषणा?
जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे 5 वे भारतीय; याआधी कोणी अध्यक्षपद भूषविले?, पाहा!