Zaheer Khan IPL 2025 : मोठी घोषणा! गौतम गंभीरची जागा घेतली मुंबईच्या पठ्ठ्याने; फ्रँचायझीने दिली ही जबाबदारी
Zaheer Khan join LSG as Team Mentor : भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
Zaheer Khan join LSG as Team Mentor : भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू झहीर खानला (Zaheer Khan) संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. झहीरची क्रिकेट कारकीर्द चमकदार आहे. निवृत्तीनंतरही तो कोणत्या ना कोणत्या संघाशी जोडला गेला आहे. आता तो लखनऊ कॅम्पमध्ये आला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये झहीर दिसत आहे.
All your anticipation ends here!
— RP Sanjiv Goenka Group (@rpsggroup) August 28, 2024
The King of reverse swing, Indian legend #ZaheerKhan takes charge as the mentor of @LucknowIPL #ZaheerNowSuperGiant@DrSanjivGoenka @ImZaheer pic.twitter.com/sOr9vcyzYu
गौतम गंभीरच्या जाण्यानंतर लखनऊ फ्रँचायझीचे मेंटरचे पद रिक्त होते. म्हणजेच गौतम गंभीरची (Gautam Gambhir) जागा आज झहीर खान घेणार आहे. झहीर खानला मेंटॉर बनवल्याने लखनऊला दुहेरी फायदा झाला आहे. मार्गदर्शकासह, माजी भारतीय दिग्गज त्यांचा गोलंदाजीचा अनुभव संघाच्या गोलंदाजांसोबत शेअर करू शकतो, कारण लखनऊमध्ये मार्गदर्शकासह गोलंदाजी प्रशिक्षकाची जागाही रिक्त आहे. यापूर्वी मॉर्न मॉर्केल लखनऊचा गोलंदाजी प्रशिक्षक होता, पण तो आता टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. झहीर खान याआधी मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक होता. 2018 ते 2022 पर्यंत त्याने मुंबई इंडियन्समध्ये क्रिकेट संचालकपद भूषवले. याशिवाय, माजी भारतीय गोलंदाज ग्लोबल क्रिकेट डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्रमुख देखील होते.
View this post on Instagram
100 आयपीएल सामन्यांचा अनुभव
उल्लेखनीय आहे की झहीर खानने त्याच्या करिअरमध्ये 100 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 99 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 27.27 च्या सरासरीने 102 विकेट घेतल्या, ज्यामध्ये त्याचे सर्वोत्तम 4/17 होते. या कालावधीत त्याने 7.59 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या.
हे ही वाचा -
जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे 5 वे भारतीय; याआधी कोणी अध्यक्षपद भूषविले?, पाहा!
जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे 5 वे भारतीय; याआधी कोणी अध्यक्षपद भूषविले?, पाहा!