एक्स्प्लोर

Shoaib Akhtar: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली!

Shoaib Akhtar on Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय.

Shoaib Akhtar on Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. पीटीआय वृत्त संस्थनं दिलेल्या माहितीनुसार, भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळं टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. जसप्रीत बुमराहनं टी-20 विश्वचषकातून बाहेर पडणं, भारतीय संघाच्या अचडणीत वाढ करू शकतात. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. यातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. ज्यात शोएब अख्तर जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीवर भाष्य करतोय. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तरनं वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप आणि न्यूझीलंडचा दिग्गज शेन बॉन्ड यांचं उदाहरण देत म्हटलंय की,"भारत बुमराहला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवू शकत नाही. कारण, बुमराहची अॅक्शन पाठीच्या दुखापतींना आमंत्रण देऊ शकतात. बुमराहची गोलंदाजी फ्रंटल अॅक्शनवर अवलंबून आहे. अशा प्रकारची अॅक्शन असलेले गोलंदाज त्यांच्या पाठीवरून आणि खांद्यावरून वेग प्राप्त करतात. पुढच्या आर्म अॅक्शन असलेल्या गोलंदाजाच्या पाठीला दुखापत झाल्यास, त्यानं कितीही प्रयत्न केल्यास दुखापत त्याचा पाठलाग सोडत नाही"

जसप्रीत बुमराहची जागा कोण भरून काढणार?
जसप्रीत बुमराह विश्वचषकाला मुकणार असल्याचं बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं याबाबत माहिती दिलीय. महत्वाचं म्हणजे, जसप्रीत बुमराह संघाबाहेर झाल्यास त्याच्याऐवजी कोणत्या गोलंदाजाला संघात संधी मिळेल? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. तसेच जसप्रीत बुमराहचा पर्यायी गोलंदाज त्याची जागा भरून काढू शकतात का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. 

जसप्रीत बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
जसप्रीत बुमराहनं 30 कसोटी, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. कसोटी सामन्यात बुमराहच्या नावावर 128 विकेट्सची नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बुमराहनं 121 विकेट्स घेतल्या आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 70 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह हा भारताचा मुख्य गोलंदाज असून त्याचं विश्वचषकातून बाहेर पडणं भारतीय संघासाठी धोक्यांची घंटा आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Marathi Serial Updates :  खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sangli : Chandrahar Patil यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट, Nana Patole यांच्याकडून स्वागतWari Loksabhechi Dharashiv EP 11 : ओमराजे की अर्चना पाटील? धाराशिवकर कुणाच्या मागे?CM Eknath Shinde Full Speech : आता फक्त धनुष्यबाण जिंकणार, दोघांची भांडण तिसऱ्यांचा लाभ नाही होणारCM Eknath Shinde meets Vinod Patil : भुमरेंना उमेदवारी, विनोद पाटलांची माघार, मुख्यमंत्री भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Marathi Serial Updates :  खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
Vishal Patil : बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
Konkona Sen Sharma :  10 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर आता 7 वर्ष लहान अभिनेत्याला कोंकणा करतेय डेट
10 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर आता 7 वर्ष लहान अभिनेत्याला कोंकणा करतेय डेट
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'ही जागा...'
नाशिकच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'ही जागा...'
Embed widget