(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA: रोहित शर्माचं उत्कृष्ट नेतृत्व; एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार, धोनीलाही टाकलं मागं
India vs South Africa 1st T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 8 विकेट्सनं (IND vs SA) विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय.
India vs South Africa 1st T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 8 विकेट्सनं (IND vs SA) विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर खास विक्रमाची नोंद झालीय. एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा रोहित शर्मा भारतीय कर्णधार ठरलाय. तसेच त्यानं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाही (MS Dhoni) मागं टाकलंय. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2016 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं कॅलेंडर वर्षात आतापर्यंत 16 टी-20 सामन्यात विजय मिळवलाय. तर, या यादीत धोनी दुसऱ्या क्रमाकांवर आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2016 मध्ये 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 फॉर्मेटमध्ये शतक झळकावलं होतं. भारताकडून केवळ दोन खेळाडूंना अशी कामगिरी करता आली. रोहितसोबत रैनानंही शतक ठोकलंय.
एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकणारे भारतीय कर्णधार:
क्रमांक | नाव | विजय | वर्ष |
1 | रोहित शर्मा | 16 | 2022 |
2 | महेंद्रसिंह धोनी | 15 | 2016 |
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर आठ विकेट्सनं विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारी खेळ्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 8 विकेट्सनं विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) महत्वाची भूमिका बजावली. आपल्या स्पेलमधील पहिल्याच षटकात अर्शदीपनं दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. अर्शदीप आणि दीपक चाहरच्या भेदक माऱ्यानंतर अवघ्या 9 धावांवर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या अर्शदीप सिंहला नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय.
अर्शदीपची भेदक गोलंदाजी
अर्शदीप सिंहनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केलीय. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील दुसऱ्या षटकात कर्णधार रोहित शर्मा अर्शदीपकडं चेंडू सोपवला. याच षटकात त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजाला माघारी धाडलं. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्यानं क्विंटन डी कॉकला बाद केलं. त्यानंतर पाचव्या चेंडूवर रिली रॉसो आणि सहाव्या चेंडूवर डेव्हिड मिलरला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्याच्या पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेणारा अर्शदीप सिंह पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय.
हे देखील वाचा-