Shaheen Afridi Baby Boy : आफ्रिदीच्या घरात हलला पाळणा, लेकाचा जन्म, पाकिस्तान-बांगलादेश कसोटी सुरु असताना मिळाली गोड बातमी
Pakistani Pacer Shaheen Afridi First Child : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी रावळपिंडीत येथे खेळवली जात आहे.
Shaheen Afridi Blessed With Baby Boy : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी रावळपिंडीत येथे खेळवली जात आहे. त्याचवेळी, या कसोटीदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या घरात पाळणा हलला आहे.
शाहीन आफ्रिदीची पत्नी अंशा आफ्रिदीने मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचे नाव अली यार ठेवण्यात आले आहे. यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदीचे लग्न झाले होते.
बांगलादेश मालिकेदरम्यान शाहीन आफ्रिदीला मिळणार सुट्टी?
पाकिस्तान कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी सांगितले की, शाहीन आफ्रिदीला मुलगा झाला आहे, त्यामुळे पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. जर त्याला विश्रांती हवी असेल तर आम्ही ते देण्यास तयार आहोत, जेणेकरून तो आपल्या पत्नीसोबत वेळ घालवू शकेल. पण मुलाच्या जन्मानंतर शाहीन आफ्रिदी बांगलादेश कसोटी मालिकेला मुकणार का? आतापर्यंत या प्रश्नाचे अधिकृत उत्तर मिळालेले नाही. मात्र, त्याला रजा हवी असल्यास ती मिळेल, असे पाकिस्तान व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
شاہین آفریدی اور اس کی اہلیہ کے ہاں بیٹے کی پیدائش۔۔۔۔۔
— @nazakatspeaks (@MahrNazakat1287) August 24, 2024
Congratulation's Shaheen Afridi Family😍💝@iShaheenAfridi pic.twitter.com/aMDCYBHcte
शाहीन आफ्रिदीची कारकीर्द
शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदीचे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लग्न झाले होते. अंशा आफ्रिदी ही पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे. आतापर्यंत शाहीन आफ्रिदीने 30 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त 53 एकदिवसीय आणि 70 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
शाहीन आफ्रिदीच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये 113 विकेट्स आहेत. त्याचबरोबर या वेगवान गोलंदाजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 23.94 च्या सरासरीने आणि 5.54 च्या इकॉनॉमीने 104 बळी घेतले आहेत. तर टी-20 फॉरमॅटमध्ये शाहीन आफ्रिदीने 7.66 च्या इकॉनॉमी आणि 20.4 च्या सरासरीने 96 फलंदाजांना आपला बळी बनवले आहे.
हे ही वाचा :
PAK vs BAN Test : १५ रुपयांतही तिकीट कुणी घेईना, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घ्यावा लागला निर्णय