KL Rahul Fact Check : केएल राहुलची निवृत्तीची घोषणा? व्हायरल पोस्ट पाहून चाहते गोंधळले; जाणून घ्या सत्य
KL Rahul Retirement : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलचे नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
KL Rahul Retirement : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलचे नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. राहुल शेवटचा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता, ज्यामध्ये त्याची बॅट पूर्णपणे शांत होती. आजकाल तो बांगलादेशविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी करण्यात व्यस्त आहे. पण दरम्यान, गुरुवारी त्याच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली.
खरंतर राहुलने स्टोरीच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, मला एक घोषणा करायची आहे, तुम्ही थांबा.... त्यानंतर त्याच्या या घोषणेबाबत चाहत्यांनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली. काही चाहत्यांना असा विश्वास होता की, राहुल टी-20 फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. याबाबतची त्यांची एक पोस्टही व्हायरल झाली होती, ज्यामध्ये त्यांनी एक लांबलचक नोट लिहून निवृत्तीची घोषणा केली होती. ही पोस्ट खरी की खोटी याबद्दल चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.
केएल राहुलच्या व्हायरल पोस्टचे काय आहे सत्य?
काही चाहत्यांनी असा दावाही केला होता की, राहुलने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावरून पोस्ट डिलीट केली होती. पण राहुलची ती व्हायरल पोस्ट पूर्णपणे फेक होती हे आम्ही तुम्हाला सांगतो. राहुलने निवृत्तीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. काही खोडकरांनी फोटोशॉपच्या मदतीने त्याची इंस्टाग्राम स्टोरी एडिट करून निवृत्तीच्या घोषणेची लिंक देऊन सोशल मीडियावर व्हायरल केली.
केएल राहुल सध्या केवळ 32 वर्षांचा आहे. राहुल जरी भारताच्या टी-20 संघाबाहेर असला तरी तो एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये मेन इन ब्लू संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. राहुलला फक्त त्याची लय शोधायची आहे, ज्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.
आगामी काळात बांगलादेश व्यतिरिक्त भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघांविरुद्ध देखील कसोटी सामने खेळावे लागतील आणि राहुल संघाचा भाग असेल अशी पूर्ण आशा आहे. या आगामी संघांविरुद्ध राहुलची कामगिरी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
हे ही वाचा :