Maharaja Trophy 3 Super Overs : 1, 2 नाही तर 3 सुपर ओव्हर: क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात थरारक सामना, यापूर्वी कधीच पाहिला नसेल... VIDEO
तुम्ही आतापर्यंत एकापेक्षा जास्त क्रिकेट सामने पाहिले असतील. विशेषत: टी-20 सामन्यांनी तुमचे खूप मनोरंजन केले असेल, परंतु एका सामन्याने उत्कंठेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत....
3 super overs in T20 match Maharaja Trophy : आधुनिक युगाने क्रिकेटलाही मॉडर्न बनवले आहे. टी-20 सोडा, आता टी-10ची वेळ आली आहे. क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये चाहत्यांना रोमान्सचा एक डोस मिळतो जो इतर कोठेही मिळत नाही. पण त्याच दरम्यान एक टी-20 सामना झाला ज्याने सर्व मर्यादा ओलांडल्या.
अनेकदा टी-20 सामना टाय झाला की, विजेता ठरण्यासाठी सुपर ओव्हर घेतल्या जाते, परंतु त्याच सामन्यात तीन सुपर ओव्हर असतील तर काय होईल याची कल्पना करा. होय, कर्नाटकमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 स्पर्धेत असाच काहीसा प्रकार घडला आहे. 2024 महाराजा महाराजा करंडक टी-20 स्पर्धेत शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात एक किंवा दोन नव्हे तर तीन सुपर ओव्हर झाल्या.
खरं तर, महाराजा ट्रॉफीचा सतरावा सामना बेंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात शुक्रवारी बेंगळुरूमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये मनीष पांडेच्या नेतृत्वाखालील हुबळी टायगर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगळुरू ब्लास्टर्सनेही 20 षटकांत 164 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.
निकालासाठी सुपर ओव्हर घेण्यात आली. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरू ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करत 10 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात हुबळी टायगर्स फक्त 10 धावा करू शकला आणि सामना पुन्हा बरोबरीत राहिला.
अशा परिस्थितीत दुसऱ्यांदा सुपर ओव्हर घेण्यात आली. या वेळी हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी करत 8 धावा केल्या आणि बेंगळुरू ब्लास्टर्सला 9 धावांचे लक्ष्य दिले, परंतु मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू संघ देखील केवळ 8 धावा करू शकला आणि सामना पुन्हा बरोबरीत सुटला.
सामना बरोबरीत सुटण्याची ही तिसरी वेळ होती. त्यानंतर तिसऱ्या सुपर ओव्हरची पाळी आली, ज्यामध्ये बेंगळुरू ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करत 12 धावा केल्या, परंतु यावेळी हुबळी टायगर्सने कोणती पण चूक केली नाही आणि एकही विकेट न गमावता 13 धावा केल्या आणि सामना जिंकला.
THREE SUPER OVER IN A T20 MATCH. 🤯
— Johns. (@CricCrazyJohns) August 23, 2024
- History created at Maharaja Trophy....!!!! pic.twitter.com/maMyclQ10A
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामन्याचा निकाल लावण्यासाठी तीन सुपर ओव्हर घेण्यात आल्या आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यात दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाले. याआधी आयपीएलमध्येही एका सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या आहेत, मात्र तीन सुपर ओव्हर पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या आहेत. महाराजा ट्रॉफीचे आयोजन कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) द्वारे केले जात आहे. त्याचप्रमाणे दिल्ली प्रीमियर लीगचे आयोजनही दिल्लीत होत आहे.
हे ही वाचा :