IND vs SA: विराट वेडा! कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मोजले 23 हजार, कट्टर फॅनची गोष्ट
South Africa tour of India 2022: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात गुवाहाटीच्या (Guwahati) बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर (Barsapara Cricket Stadium) दुसरा टी-20 सामना खेळला गेला.
South Africa tour of India 2022: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात गुवाहाटीच्या (Guwahati) बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर (Barsapara Cricket Stadium) दुसरा टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं 16 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतलीय. भारताच्या विजयात मोलाचं योगदान देणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्या चाहत्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, विराटसोबत सेल्फी घेणाऱ्या या चाहत्याची धडपड जाणून घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विराट सोबत सेल्फी घेण्यासाठी त्यानं 23 हजार खर्च केले. यापूर्वीही संबंधित तरूणानं अनेकदा कोहलीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरक्षारक्षकांमुळं त्याला विराटजवळ जाता आलं नव्हतं.
प्रसारमाध्यमांत झळकत असलेल्या बातमीनुसार, राहुल रॉय अंस विराटच्या चाहत्याचं नाव आहे. राहुलनं एक दिवसापूर्वी टीम इंडियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण विमानतळावरील बॅरिकेडमुळं त्याला तसं करता आलं नाही. त्याची आशा पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर त्यानं गुवाहाटीतील एका सेव्हन स्टार हॉटेलमधील एक खोली बूक केली, जिथे टीम इंडिया थांबली होती. या हॉटेलमधील एक खोलीचा एक दिवसाचा खर्च तब्बल 23 हजार रुपये इतका आहे. परंतु, विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी त्यानं पैशांची पर्वा न या हॉटेलमधील खोली बूक केली. त्याच्या या प्रयत्नांना अखेरच यश मिळालं आणि विराटसोबत सेल्फी घेण्याचं त्याचं गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न साकार झालं.
विराटसोबत सेल्फी घेतल्यानंतर राहुल काय म्हणाला?
विराटसोबत सेल्फी घेतल्यानंतर राहुल रॉयचा आनंद गगणात मावेना असाच झाला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला की "माझं नशीब चांगलं होतं की, त्या हॉटेलमध्ये मला एक खोली रिकामी मिळाली. मी सकाळी विराटला ब्रेकफस्ट एरियामध्ये पाहिलं. मी त्याला आवाज दिला. पण सुरक्षारक्षकांनी मला रोखलं. मी आजारी असल्याचं आणि भूक लागल्याचं कारण बनवलं. मला तिथे जाण्याची परवानगी मिळाली. मी सतत विराटला आवाज देत होतो. अखेर त्यानं माला ब्रेकफस्ट एरियाच्या बाहेर मिळण्यास सांगतलं. मी विराट कोहलीचं फॅन पेज तयार केलं आहे. त्याचा कोलाज फ्रेम करून घेऊन मी तिथं पोहोचलो. या पेजचे एक लाख फॉलोअर्स आहेत. परंतु, विराटनं परवानगी नसल्यानं घेऊन जाऊ शकत नसल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर त्यावर विराट ऑटोग्राफ देऊन ते मला परत केलं. या भेटीची ही आठवण आहे. आम्ही सेल्फीही घेतली."
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत भारताची विजयी आघाडी
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या केएल राहुल, सूर्यकुमार यादवच्या अर्धशतक आणि कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांच विशाल लक्ष्य ठेवलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना डेव्हिड मिलरनं ( नाबाद 106 धावा) शतक आणि क्विंटन डी कॉकनं ( नाबाद 69) अर्धशतक झळकावलं. पण त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 20 षटकात तीन विकेट्स गमावून 221 धावा केल्या. या विजयासह भारतानं तीन सामन्याची टी-20 मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.
विराटच्या टी-20 क्रिकेटमधील 11 धावा पूर्ण
गुवाहाटीमध्ये विस्फोटक फलंदाजी करत विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा पल्ला गाठला. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. तर जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीनं 354 टी 20 सामन्यात 11 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
हे देखील वाचा-