PAK vs ENG: पाकिस्तानला त्यांच्याच मायदेशात नमवलं; इंग्लंडनं 7 सामन्यांची टी-20 मालिका जिंकली!
Pakistan vs England, 7th T20I, Highlights: लाहोरमधील (Lahore) गद्दाफी स्टेडियमवर (Gaddafi Stadium) खेळण्यात आलेल्या निर्णायक आणि अखरेच्या टी-20 सामन्यात इंग्लंडनं यजमान पाकिस्तानचा 67 धावांनी पराभव केलाय.
Pakistan vs England, 7th T20I, Highlights: लाहोरमधील (Lahore) गद्दाफी स्टेडियमवर (Gaddafi Stadium) खेळण्यात आलेल्या निर्णायक आणि अखरेच्या टी-20 सामन्यात इंग्लंडनं यजमान पाकिस्तानचा 67 धावांनी पराभव केलाय. या विजयासह इंग्लंडनं सात सामन्यांची टी-20 मालिका 4-3 नं जिंकली. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत टी-20 विश्वचषकापूर्वी 17 वर्षांनंतर पाकिस्तानात पोहोचलेल्या इंग्लंड संघाचा हा दमदार विजय आहे. ऑस्ट्रेलिया रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्यापू्र्वी पाकिस्तानविरुद्धच्या या विजयानं इंग्लंडच्या संघाचं मनोबल वाढेल.
इंग्लंडची दमदार फलंदाजी
नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंच्या संघानं 20 षटकात तीन विकेट्स राखून पाकिस्तानसमोर 210 धावांचं लक्ष्य ठेवलं. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मलाननं 47 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 78 धावांची नाबाद खेळी खेळली. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 142 धावाच करू शकला. या सामन्यातही कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवाननंची बॅटीतून धावा निघाल्या नाहीत. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघाला मोठ्या पराभवाला सामारे जावा लागलंय.
इंग्लंडच्या गोलंदाजासमोर पाकिस्तानचं लोटांगण
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची दमछाक झाली. कर्णधार बाबर आझम (4 धावा) आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान एक धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शान मसूदनं 43 चेंडूत 56 धावांचं अर्धशतकी खेळी केली. पण त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणत्याही खेळाडूची साथ मिळाली नाही. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सनं या काळात सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. ज्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या मोठ्या विकेटचा समावेश आहे.
इंग्लंडची तडाखेबाजी खेळी
यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजासमोर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी गुढघे टेकले. दरम्यान, सॉल्ट (20 धावा) आणि हेल्स (18 धावा) बाद झाल्यानंतर डेव्हिड मलाननं 78 धावा केल्या. तर, बेन डकेटनं 19 चेंडूत 30 आणि हॅरी ब्रूकनं 29 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं नाबाद 46 धावा केल्या. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाचा स्ट्राइक रेट 130 च्या खाली नव्हता.
हॅरी ब्रूकचं मालिकेत दमदार फलंदाजी
हॅरी ब्रूकनं संपूर्ण मालिकेत शानदार फलंदाजी करताना दिसला. ज्यामुळं त्याला मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं. तर, अखेरच्या आणि सातव्या सामन्यात निर्णायक खेळी करणाऱ्या डेव्हिड मलानला त्याच्या नाबाद 78 धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हे देखील वाचा-