धोनी, कोहलीमुळे माझ्या मुलाची 10 वर्षे वाया गेली, संजू सॅमसनच्या वडिलांच्या गंभीर आरोपामुळे खळबळ!
संजू सॅमसनच्या वडिलांनी धोनी, कोहली आणि रोहित शर्मावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. या आरोपांंनंतर एकच खळबळ उडाली आहे.
Sanju Samson Father : भारताचा स्टार क्रिकेटपटू संजू सॅमसनची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये सलग दोन शतके झळकावून समस्त जगाचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं. त्याच्या या कामगिरीचे भारतभरात स्वागत करण्यात आलं. याच धडाकेबाज संजू सॅमसन आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. संजूचे वडील सॅमसन विश्वनाथ यांनी भारताची माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली तसेच भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मावर गंभीर आरोप
सॅमसन विश्वनाथ यांनी केलेल्या आरोपांची सध्या सगळीकडेच चर्चा एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा होत आहे. त्यांच्या या आरोपांनुसार एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यामुळे संजू सॅमसनचे करिअर उद्ध्वस्त झाले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी गौतम गंभीर यांच्याकडे आल्यानंतर संजू सॅमसनला पुन्हा एकदा टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.
माझ्या मुलाला 10 वर्षे संघर्ष करावा लागला
सॅमसन विश्वनाथ यांनी एका वृत्तसंस्थेला नुकतेच एक मुलाखत दिली. या मुलखतीत "असे 3-4 लोक आहेत, ज्यांच्यामुळे माझ्या मुलाच्या करिअरचे 10 वर्षे उद्ध्वस्त झाले. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, राहुल द्रवीड या चार लोकांमुळे माझ्या मुलाला 10 वर्षे संघर्ष करावा लागला. या चार लोकांनी माझ्या मुलाला जेवढा त्रास दिला, संजू सॅमसन तेवढाच मजबूत झाला," असे सॅमसन विश्वनाथ म्हणाले. संजू सॅमसन या वर्षाच्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होते. मात्र वार्म-अप सामन्यांत खराब खेळी केल्यामुळे संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही.
नवा कर्णधार आणि नव्या कोचनं साथ दिली
भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळाल्यानंतर मात्र संजू सॅमसनचं नशीब पालटलं. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी-20 फॉरमॅटचा कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांनी संज सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊन खेळण्याची संधी दिली. याच विश्वासामुळे संजू सॅमसनने सलग दोन सामन्यांत शतकी खेळी करून दाखवली. टी-20 फॉरमॅटमध्ये सलग दोन समान्यांत शतक झळकावणारा सॅमसन पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
सूर्यकुमार यादनं ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवला
सूर्यकुमार यादवने माझ्यावर कशाप्रकारे विश्वास ठेवला याबाबत संजू सॅमसनने माहिती दिली होती. "दिलीप ट्रॉफीचे सामने चालू होते त्यावेळी सूर्या माझ्याजवळ आला होता. पुढचे सात सामने तू फलंदाजीसाठी सलामीला जाशील. काहीही होऊ देत, मी तुझ्या सोबत असेल, असे मला सूर्या म्हणाला होता, असं संजू सॅमसनने सांगितलं.
दरम्यान, संजू सॅमसनच्या वडिलांनी थेट खेळाडूंची नावे घेतल्यामुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
अक्षर पटेलचा अप्रतिम झेल, डेव्हिड मिलर अवाक्; सामनाही क्षणात फिरला, नेमकं काय घडलं?, पाहा Video