SAFF U-17 Championship 2022: भारतानं एसएएफएफ अंडर-17 चॅम्पियनशिपचा खिताब जिंकला, नेपाळविरुद्ध एकतर्फी विजय
SAFF U-17 Championship 2022: दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अंडर-17 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं नेपाळविरुद्ध (India vs Nepal) एकतर्फी विजय मिळवलाय.
SAFF U-17 Championship 2022: दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (South Asian Football Federation) अंडर-17 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं नेपाळविरुद्ध (India vs Nepal) एकतर्फी विजय मिळवलाय. या सामन्यात भारतानं नेपाळला 4-0 नं पराभूत करून सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलीय. भारताकडून बॉबी सिंह (Boby Singh), कोरोऊ सिंह (Korou Singh), कर्णधार वनलालपेका गुईटे (Vanlalpeka Guite) आणि अमन (Aman) यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. नेपाळनं ग्रुप लीगमध्ये भारताचा 3-1 ने पराभव केला, परंतु अंतिम फेरीत भारताविरुद्ध एकही गोल करू शकला नाही.
या सामन्याच्या 18 व्या मिनिटांत भारताकडून बॉबीनं गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.बॉबीच्या गोलमध्ये गुईटेनं महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, 12 मिनिटानंतर कोरोऊ सिंहनं गोल करून भारताच्या खात्यात आणखी एका गोलची भर घातली.त्यानंतर नेपाळचा संघ गोल करण्यासाठी धडपड करताना दिसला. नेपाळच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. दरम्यान, कर्णधार प्रशांत लक्षमनं 39व्या मिनिटाला डॅनी लश्रामला कोपरा मारला, ज्यामुळं त्याला रेड कार्ड दाखवण्यात आलं. सामन्याच्या मध्यांतरनंतर 63 व्या मिनिटा गुईटेनं भारताकडून तिसरा गोल केला. तर, अमनं इंजरी टाईमध्ये चौथा गोल करून भारताच्या विजयाचा पाया रचला.
ट्वीट-
साहिलला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार
भारतीय कर्णधार गुईटेला स्पर्धेतील सर्वात उपयुक्त खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. तर, साहिलला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार मिळालाय.
भारताच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक काय म्हणाले?
भारताचे मुख्य प्रशिक्षक विबियानो फर्नांडिस यांनी आपल्या खेळाडूंचे कौतुक केलं. "मला माझ्या खेळाडूंचा खूप अभिमान आहे. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. सहाय्यक कर्मचारी आणि खेळाडू दोघानांही भारताच्या विजयाचं समान श्रेय जातं."
दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाची स्थापना कधी झाली?
दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ ही दक्षिण आशियातील फुटबॉल खेळणाऱ्या राष्ट्रांची संघटना आहे. त्याची स्थापना 1997 मध्ये झाली. बांगलादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाचे संस्थापक सदस्य आहेत. भूतान 2000 मध्ये महासंघात सामील झाला.
हे देखील वाचा-