सचिन तेंडुलकर नॅशनल आयकॉन, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करणार - निवडणूक आयोगाची घोषणा
Sachin Tendulkar : निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
Sachin Tendulkar : निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी याची घोषणा केली आहे. बुधवारी सचिन तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांच्याद्वारे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली करण्यात येणार आहे. हा सामंजस्य करार तीन वर्षांचा असेल.
निवडणूक आयोग आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये सामंजस्य करार बुधवारी होणार आहे. या कराराअंतर्गत सचिन तेंडुलकर मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करेल. त्यासाठी तो तीन वर्षांपर्यंत काम करेल.
निवडणूक आयोगाने याबाबत दिलेल्या वक्तव्यात म्हटलेय की, 'आगामी निवडणुकांमध्ये, खासकरुन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या अद्वितीय प्रभावाचा फायदा होईल. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल. सचिन तेंडुलकर यांचा युवकांमध्ये मोठा प्रभाव आहे. त्यामुळे नवे मतदार आणि आधीचे मतदारही मतदानासाठी पुढे येतील.'
निवडणूक आयोगाने या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मतदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शहरी उदासीनता आणि मतदानाप्रती तरुणांना प्रत्साहन करण्याचे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे. अधिकाअधिक मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आयोग विविध क्षेत्रातील नामवंतांना आपला 'नॅशनल आयकॉन' म्हणून जाहीर करत आहे. गतवर्षी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. त्याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, एमएस धोनी, आणिर खान आणि मेरी कोम यासारख्या दिग्गजांना नॅशनल आयकॉन केले होते. यंदा क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
Sachin Tendulkar to be declared as the "National Icon" by the Election Commission of India. [RevSportz] pic.twitter.com/IPb1t37EnP
— Johns. (@CricCrazyJohns) August 22, 2023
सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जाते. क्रिकेटमध्ये भूतो न भविष्यति कामगिरी केल्यामुळे भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. सचिन तेंडुलकर याने 200 कसोटी सामन्यात 51 शतकांच्या मदतीने 15921 धावांचा पाऊस पाडला आहे. कसोटीमध्ये त्याने 68 अर्धशतकेही ठोकली आहे. 463 एकदिवसीय सामन्यात सचिन तेंडुलकर याने 49 शतकांसह 18 हजार 426 धावा चोपल्या आहेत. वनडेमध्ये सचिनच्या नावावर 96 अर्धशतके आहेत.
आणखी वाचा :
Asia Cup 2023 : आशिया चषकात फिरकीच भारताची कमकुवत बाजू, एकट्या कुलदीपवर भार
Asia Cup 2023: ना हार्दिक सलामीला येणार, ना अश्विनला दार बंद, रोहित-आगरकरचं A टू Z प्लॅनिंग