(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आशिया चषकाआधी रोहित शर्मा तिरुपती बालाजी मंदिरात, व्हिडीओ व्हायरल
Rohit Sharma At Tirupathi Balaji Temple : आशियाच चषकाला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.
Rohit Sharma At Tirupathi Balaji Temple : आशियाच चषकाला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 2 सप्टेंबररोजी होणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश संघाने आशिया चषकासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. लवकरच भारतीय संघाचीही घोषणा केली जाईल. भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर आहे. टी20 मालिकेतून सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आलाय. आशिया चषक आणि विश्वचषकामुळे विराट-रोहितसह काही सिनिअर खेळाडूंना आराम दिलाय. सध्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आशिया चषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासह तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचला. भारतीय कर्णधारासोबत पत्नी रितिका सजदेह आणि मुलगीही स्पॉट झालेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
रोहित शर्मा आणि कुटुंबाचा तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया नेटकरी कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्माला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत उज्जैनच्या महाकाल मंदिरात पोहोचला होता. आता रोहित शर्माने तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचून आशीर्वाद घेतले. व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Rohit Sharma & his family at Tirupathi Balaji Temple ahead of Asia Cup.
— Johns. (@CricCrazyJohns) August 13, 2023
- Beautiful pictures. pic.twitter.com/5NcZuN8xhh
Rohit Sharma & his family visited Tirupathi Balaji Temple.pic.twitter.com/2HRFACIzdJ
— Johns. (@CricCrazyJohns) August 13, 2023
तिलक वर्माबद्दल काय म्हणाला कर्णधार रोहित -
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने युवा फलंदाज तिलक वर्माचे कौतुक केले. रोहित शर्मा म्हणाला की, मी मागील जवळपास दोन वर्षांपासून तिळक वर्माला पाहतोय, तो एक महान खेळाडू आहे. त्याला धावा करण्याची भूक आहे, जी क्रिकेटपटू म्हणून खूप महत्त्वाची आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, तिळक वर्मा ज्या वयात आहे, त्यापेक्षा जास्त परिपक्व आहे. त्याला त्याची फलंदाजी चांगली माहीत आहे. जेव्हा मी तिलक वर्मा याच्याशी बोललो तेव्हा मला त्यावेळी समजले की या खेळाडूला त्याचे फलंदाजीचे कौशल्य माहित आहे. मैदानावरील नाजूकपणा काय असतो? हे त्याला चांगलेच माहीत आहे. कधी आणि कसे खेळायचे, याबाबतही तिलकला सर्व माहिती आहे.