T20 World Cup 2022: भारताला दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा ताज जिंकवून देण्यासाठी 'हे' 15 खेळाडू उतरतील मैदानात!
ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयसीसीच्या ही मोठी स्पर्धा खेळण्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय.
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयसीसीच्या ही मोठी स्पर्धा खेळण्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं भारताच्या आयसीसी टी-20 विश्वचषक संघात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद शमीची (Mohammed Shami) निवड केलीय. तसेच बीसीसीआयनं या स्पर्धेसाठी अंतिम 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. या खेळाडूंवर टी-20 विश्वचषकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमारच्या कामगिरीवर सर्वांच लक्ष
टी-20 विश्वचषकात भारतीय फलंदाजांकडं सर्वांचं लक्ष असेल. भारतीय संघातील फलंदाजीचा संपूर्ण भार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. संपूर्ण देशाला या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल.
दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतवर यष्टीरक्षकांची जबाबदारी असेल
भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाजाची जबाबदारी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यावर असेल. यावेळी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देण्यासाठी दोन्ही खेळाडू सर्वतोपरी प्रयत्न करतील. मात्र, भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिनेश कार्तिक की ऋषभ पंतला यापैकी कोणाला संधी मिळते? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
या अष्टैपलू खेळाडूंकडून चांगल्या कामगिरी अपेक्षा
हार्दिक पंड्या,अक्षर पटेल आणि दीपक हुडा या तीन अष्टपैलू खेळाडूंची टी-20 विश्वचषकाच्या अंतिम 15 सदस्यीय संघाच्या यादीत निवड झाली आहे. दरम्यान, फलंदाजीसह गोलदांजीत उत्कृष्ट कामगिरी बजावून संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी या तिन्ही खेळाडूंवर असेल.
मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमारकडं भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व
भारतीय संघानं आपल्या अंतिम 15 सदस्यीय संघाच्या यादीत यादीत आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद शमी या गोलंदाजांचा समावेश केलाय. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर आपली सर्व शक्ती पणाला लावून हे गोलंदाज भारताला दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा ताज मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शामी,
हे देखील वाचा-
- टी 20 विश्वचषकात मध्ये सर्वाधिक सामने कोण खेळले, सर्वाधिक सामन्यात कर्णधार कोण? सर्वाधिक अर्धशतकं कुणाच्या नावावर?