(Source: Poll of Polls)
टी 20 विश्वचषकात मध्ये सर्वाधिक सामने कोण खेळले, सर्वाधिक सामन्यात कर्णधार कोण? सर्वाधिक अर्धशतकं कुणाच्या नावावर?
ICC Men's T20 World Cup : विश्वचषकात अनेक नवीन विक्रम होतील काही जुने विक्रम मोडले जाणार आहेत. आतापर्यंतच्या टी 20 विश्वचषकात झालेल्या विक्रमावर एक नजर मारुयात.
ICC Men's T20 World Cup : अवघ्या काही तासात ऑस्ट्रेलियातील टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. 16 संघामध्ये रनसंग्राम होणार आहे. 45 सामन्यानंतर टी 20 विश्वचषकाचा विजेता संघ कोण? यावरुन पडदा उठणार आहे. भारतासह यजमान ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड संघाला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले जात आहे. या विश्वचषकात अनेक नवीन विक्रम होतील काही जुने विक्रम मोडले जाणार आहेत. आतापर्यंतच्या टी 20 विश्वचषकात झालेल्या विक्रमावर एक नजर मारुयात...
2007 मध्ये भारतीय संघानं पहिला टी 20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2009 मध्ये पाकिस्तानने विश्वचषकाला गवसणी घातली होती. 2010 मध्ये इंग्लंड, 2012 मध्ये वेस्ट विंडिज, 2013-14 श्रीलंका, 2015-16 - वेस्ट इंडिज आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियानं टी 20 विश्वचषक जिंकलाय.
श्रीलंका संघानं 2007 मध्ये केनियाविरोधात 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 260 धावांचा डोंगर उभारला होता.
नेदरलँड संघ 39 धावांवर ऑलआऊट झाला होता. श्रीलंकेनं 2004 च्या विश्वचषकात नेदरलँडला 39 धावांवर गुंडाळलं होतं.
टी 20 क्रिकेटमध्ये श्रीलंका संघाच्या नावावर सर्वात मोठ्या विजयाची नोंद आहे. श्रीलंकेनं केनियाचा 172 धावांनी पराभव केला होता.
महेला जयवर्धने, 31 डावात एक हजार 16 धावा...
शाकीब अल हसन, बांगलादेश 30 डावांत 41 विकेट घेतल्या आहेत.
ख्रिस गेल, 31 डावात 63 षटकारांचा पाऊस
टी 20 मध्ये सर्वाधिक अर्धशतकं विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीनं 19 डावांत 10 अर्धशतकं झळकावली आहेत.
एबी डिव्हिलिअर्स, 25 डावात 23 झेल
एमएस धोनीनं 2007 ते 2016 या कालावधीत टी 20 विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व केलं. धोनीनं 33 टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. यामध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने 20 सामने जिंकले आहेत.
दिलशान 35 सामने.. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्मा हा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. रोहित शर्मानं टी 20 विश्वचषकात 33 सामने खेळले आहेत.
2012 च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या मेंडिसनं चार षटकांत 8 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये दोन षटकं निर्धाव होती.