Virat Kohli Injury : विराट कोहलीच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार?
ENG vs IND, 1st ODI : भारत उद्यापासून म्हणजेच 12 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे.
India vs England : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून नुकताच भारताने टी20 मालिकेत विजय मिळवला. आता भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात एकदिवसीय सामन्यांना (1st ODI) सुरुवात होणार आहे. पण तीन सामन्यांच्या या मालिकेला भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विराट दुखापतीमुळे सामना खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर येत असून एएनआय वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
Virat Kohli likely to miss 1st ODI against England due to injury: Sources
— ANI Digital (@ani_digital) July 11, 2022
Read @ANI Story | https://t.co/gmjz06upLt#EngvsInd #ViratKohli #CricketTwitter pic.twitter.com/10OThruBxa
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी आज पार पडलेल्या सरावादरम्यान विराट कोहली मैदानात दिसला नाही. कमरेच्या दुखापतीमुळे तो सराव करु शकला नसून आता यामुळेच तो उद्या पार पडणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही संघात नसण्याची दाट शक्यता आहे. पहिला सामना उद्या 5 वाजून 30 मिनिटांनी लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
इंग्लंडविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
हे देखील वाचा-
- IND vs ENG 2nd T20, Match Highlights : भारताची इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी, 49 धावांनी विजय, मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी
- Bakri Eid 2022 : भारतीय क्रिकेटपटूंनी साजरी केली बकरी ईद, सिराज, आवेशसह उमरानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारचा नवा विक्रम, पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा पहिलाच गोलंदाज