Rishabh Pant Injury Update : ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत, रक्त काही थांबेना अन् उभं राहणंही अवघड, अॅम्ब्युलन्समधून मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?
Rishabh Pant Injury Update Eng vs Ind 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना घडली.

Rishabh Pant Injury Update Eng vs Ind 4th Test : इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे सुरू असलेल्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. संघाचा प्रमुख यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे निवृत्त (रिटायर्ड हर्ट) झाला. त्याने 48 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या होत्या.
Rishabh Pant is driven off the field of play after suffering some severe swelling on his right foot and Ravindra Jadeja walks out to the middle... 🩹 pic.twitter.com/vJlu5CABQ8
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 23, 2025
ही घटना भारताच्या डावातील 68व्या षटकात घडली. क्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. षटकातील चौथ्या चेंडूवर बॉल सरळ पंतच्या पायावर आदळला. चेंडू लागताच पंत वेदनेत ओरडला. संघाचा फिजिओ मैदानात धावत आला. त्याने पंतचं बूट काढून पाहिलं असता, उजव्या पायाच्या लहान बोटातून रक्त येत असल्याचं आणि पाय सुजल्याचं दिसून आलं.
Rishabh Pant leaves the field on a buggy after reverse-sweeping the ball onto the top of his own foot 🤕#ENGvIND pic.twitter.com/KK1GqFODC2
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) July 23, 2025
वेदना असह्य झाल्यानं पंत रिटायर्ड हर्ट
दुखापत एवढी गंभीर होती की पंतच्या चेहऱ्यावर स्पष्ट वेदना झळकत होत्या. तो नीट चालूही शकत नव्हता, त्यामुळे त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताची धावसंख्या 67.4 षटकांत 3 बाद 212 अशी होती. पंतची अवस्था इतकी गंभीर होती की त्याला मैदानात उपलब्ध अॅम्ब्युलन्समधून थेट पवेलियनमध्ये नेण्यात आलं.
That is serious. Rishabh Pant may get ruled out of the remaining test#ENGvsIND #ENGvIND pic.twitter.com/9ITxDp3wQU
— Wickets Hitting (@offpacedelivery) July 23, 2025
पंतच्या जागी त्यानंतर रवींद्र जडेजाने फलंदाजीस सुरुवात केली. आपल्या 37 धावांच्या खेळीत पंतने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. विशेष म्हणजे, याच खेळीदरम्यान त्याने इंग्लंडच्या भूमीवर आपल्या कसोटी कारकीर्दीतील 1000 धावा पूर्ण केल्या.
मँचेस्टर कसोटीत ऋषभ पंत पुन्हा फलंदाजीला येणार?
या मालिकेत ऋषभ पंतला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यातही त्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहचा वेगवान बाउन्सर पंतच्या बोटाला लागला, ज्यामुळे तो संपूर्ण सामन्यात विकेटकीपिंग करू शकला नाही. पण, त्याने फलंदाजी केली. त्यानंतर मँचेस्टर कसोटीत त्याच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स निर्माण झाला. परंतु पंतला रिटायर हर्ट करावे लागले. म्हणजेच तो तंदुरुस्त होऊन पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. पण त्याची दुखापत किती गंभीर आहे, यासाठी आपल्याला बीसीसीआयच्या अपडेटची वाट पहावी लागेल.
Fingers crossed for our X-factor 🤞
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 23, 2025
Speedy recovery, Rishabh!#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/ZHfyMvMfNx
हे ही वाचा -





















