Eng vs Ind 4th Test : चेंडूचा इम्पॅक्ट स्टंपच्या बाहेर, तरीही शुभमन गिल OUT का? स्टोक्सच्या चेंडूनं पुन्हा गोंधळात टाकलं, VIDEO
Why Shubman Gill given LBW despite impact being outside : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना आज रंगला आहे.

England vs India 4th Test Update : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना आज रंगला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सलग चौथ्यांदा नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. पहिल्या नाही, पण दुसऱ्या सत्रात भारताने तीन विकेट गमावल्या आणि स्टोक्सचा निर्णय योग्य ठरला.
दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला धक्यावर धक्के!
भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहुल यांनी अतिशय संयमी आणि चांगली सुरुवात केली. दोघांनी मिळून 94 धावांची उत्तम भागीदारी करत डावाला भक्कम पाया घातला. जैस्वालने 10 चौकार आणि एक जबरदस्त षटकार ठोकत 58 धावांची खेळी खेळली, तर राहुलने 46 धावा करत महत्त्वाची साथ दिली.
मात्र, हा विश्वासार्ह वाटणारा डाव दुसऱ्या सत्रात डळमळू लागला. क्रिस वोक्सच्या माऱ्यापुढे राहुल बाद झाला. त्यानंतर लगेचच लियम डॉसन, जो पुनरागमनानंतर पहिलाच सामना खेळतो आहे, त्याने जैस्वालला तंबूत पाठवले आणि भारतावर थोडा दबाव आणला.
Captain 🆚 captain
— England Cricket (@englandcricket) July 23, 2025
And Ben Stokes comes out on top! 🔥
🇮🇳 1️⃣4️⃣0️⃣-3️⃣ pic.twitter.com/kjpBIGpp5K
चेंडूचा इम्पॅक्ट स्टंपच्या बाहेर, तरीही शुभमन गिल OUT का?
यानंतर मैदानात उतरलेले कर्णधार शुभमन गिल सुरुवातीला सावध खेळ करत होता. मात्र, मँचेस्टरच्या खेळपट्टीवर स्विंग आणि सीमला भरपूर मदत मिळत होती. अशा परिस्थितीत इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्स सकाळपासूनच भारतीय फलंदाजांना सतावत होता. आणि अखेर त्याच्या मेहनतीला फळ मिळालं 50व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर. त्याने टाकलेला इनस्विंगर थेट शुभमन गिलच्या पायावर लागला. विशेष म्हणजे, चेंडू स्पष्टपणे आत येत असतानाही गिलनं चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला. पण चेंडू थेट पॅडवर आदळला. त्यामुळे अंपायरने लगेच त्याला आऊट दिले.
गिलने DRS घेतला. पण नियमांनुसार जर, गिलनं शॉट खेळायचा प्रयत्न केला असता, तर चेंडूचा इम्पॅक्ट स्टंपच्या बाहेर असल्याने तो नाबाद ठरला असता. पण त्यानं नो शॉट ऑफर केला आणि म्हणूनच DRS घेऊनही काही उपयोग झाला नाही. चेंडू थेट स्टंपवर जात असल्याने गिलला आऊट ठरवण्यात आलं. त्याने 23 चेंडूत 12 धावा केल्या.
सध्या भारताची अवस्था – 160/3 (55 षटकांनंतर)
साई सुदर्शन आणि ऋषभ पंत सध्या खेळपट्टीवर आहेत. दिवसाचा खेळ संपेपर्यंत या दोघांनी टिकणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणखी एक विकेट गेली, तर सामना इंग्लंडच्या हातात जाण्याचा धोका आहे.





















