Rishabh Pant : जिगरबाज पंत! स्टिकशिवाय चालू लागला ऋषभ पंत, पाहा व्हिडीओ
Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत दुखापतीतून सावरतोय.
Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत दुखापतीतून झटपट सावरतोय. एनसीएमध्ये तो फिटनेसवर काम करत आहे. त्याची वेगाने होणारी प्रगती पाहता तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतेल. एनसीएमध्ये गेल्या आठवड्यापासून पंतचा रिहॅब प्रोग्राम सुरु आहे. बीसीसीआयच्या वर्ल्ड क्लास फॅसिलिटीच्या मदतीने फिटनेसवर काम करत आहे. दुखापतीतून सावरत असतानाच पंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ऋषभ पंत स्टीकशिवाय उभा राहिल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे. पंतने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याशिवाय टेबल टेनिस खेळतानाचीही पंतचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
ऋषभ पंत आपल्या फिटनेसबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असतो. पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. पंतने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ऋषभ पंत व्हिडीओत स्टिकशिवाय चालताना दिसत आहे. भीषण अपघातानंतर पंतला स्वत:च्या पायावरही उभे राहता येत नव्हते. चार महिन्यापासून पंत याने दुखापत बरी होण्यासाठी मेहनत घेतली आहे. ऋषभ पंत आता स्टिकशिवाय चालत असल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ऋषभ पंतचे चाहते हा व्हिडीओ पाहून इमोशनल झाले आहेत. अनेकांनी कमबॅकसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy NO MORE CRUTCHES Day!#RP17 pic.twitter.com/mYbd8OmXQx
— Rishabh Pant (@RishabhPant17) May 5, 2023
Rishabh pant is playing table tenis 😊 he is doing speed recovery #rishabh #pant #rishabhpant pic.twitter.com/vVObjHmuJx
— Rishabh pant (@rishabh_pant_1) May 5, 2023
रुरकीला जाताना झाला होता अपघात
ख्रिसमस सेलिब्रेट करून दुबईहून परतलेला ऋषभ पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होता. यादरम्यान त्याची कार मोहम्मदपूर जतजवळ दुभाजकाला धडकली आणि आग लागली. या भयानक अपघातात पंत थोडक्यात बचावला. पण त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला त्वरीत प्रथमोपचारासाठी रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कार अपघातात ऋषभ पंतच्या कपाळावर दोन कट झाल्याची माहिती बीसीसीआयला मॅक्स हॉस्पिटलला दिली होती. त्याच्या उजव्या पायाचा लिगामेंटलाही गंभाररित्या इजा झाली होती. याशिवाय पाय, पाठ, अंगठा आणि मनगटालाही इजा झाली होती. ऋषभ पंत याच्यावर काही दिवस मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तो आयपीएलमधील काही सामन्याला स्टेडिअममध्ये उपस्थित होता. दिल्लीच्या सपोर्टसाठी त्याने हजेरी लावली होती. ऋषभ पंत सध्या एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. पंत याला दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपला मुकावे लागले. आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत तयारी करत आहे. तो दुखापतीवर यशस्वी मात करुन दणक्यात पुनरागमन करेल, अशी प्रार्थना प्रत्येक चाहता करत आहे.