Rishabh Pant OUT on 99 : जखमी असूनही मैदानात उभा ठाकला, लढला, भिडला, पण एका चेंडूने घात केला, ऋषभ पंतचं शतक एका धावेने हुकलं!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे.
Rishabh Pant IND vs NZ 1st Test : ऋषभ पंत नेहमीच स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. एका हाताने षटकार मारण्याची पंतची कला संपूर्ण क्रिकेट जगताला अवगत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने फलंदाजीचे चांगलेच उदाहरण दाखवून दिले. पण त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. एका चेंडूने त्याचा घात केला. त्याने सामन्यात एकूण 105 चेंडूत 99 धावा केल्या, ज्यात त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याला विल्यम ओ'रुर्कने क्लीन बोल्ड केले.
An unfortunate end to a blistering knock from Rishabh Pant.
— BCCI (@BCCI) October 19, 2024
The #TeamIndia batter departs for 99(105) 👏👏
Live - https://t.co/FS97Llv5uq#INDvNZ | @RishabhPant17 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GqGVNjTTeN
ऋषभ पंतने आपले शतक पूर्ण केले तर त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 7वे शतक ठरले असते. त्यानंतर तो भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके करणारा यष्टिरक्षक बनला असता, पण तो नर्व्हस 90 चा बळी ठरला. सध्या, पंत आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी यष्टिरक्षक म्हणून त्यांच्या कसोटी कारकिर्दीत प्रत्येकी एकूण 6 शतके झळकावली आहेत आणि दोघेही संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. ऋद्धिमान साहाने कसोटीत 3 शतके झळकावली होती.
🤯🤯🤯
— JioCinema (@JioCinema) October 19, 2024
A colossal 1️⃣0️⃣7️⃣m six out of the park from Rishabh Pant! 💥#TeamIndia #INDvNZ #IDFCFirstBankTestTrophy #JioCinemaSports pic.twitter.com/I1WwvU7B9x
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा भारतीय यष्टिरक्षक :
ऋषभ पंत- 6 शतके
महेंद्रसिंग धोनी- 6 शतके
ऋद्धिमान साहा- 3 शतके
फारुख अभियंता- 2 शतके
सय्यद किरमाणी - 2 शतके
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाने ऋद्धिमान साहाचा यष्टिरक्षक म्हणून वापर केला, पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर ऋषभ पंत टीम इंडियाचा यष्टिरक्षक बनला. 2018 मध्ये त्याने टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. यानंतर त्याने परदेशात दमदार कामगिरी केली आणि विकेटकीपर म्हणून टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के केले.
पंतने एकट्याने भारताला गाबा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला. त्यानंतर तो टीम इंडियाचा सर्वात मोठा हिरो बनला. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी 36 कसोटी सामन्यांमध्ये 2542 धावा केल्या आहेत, ज्यात 6 शतकांचा समावेश आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 871 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1209 धावा आहेत.
हे ही वाचा -