Ravichandran Ashwin 500 Test Wickets : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास, कसोटीत 500 विकेट्स केल्या पूर्ण; कुंबळे-वॉर्न यांचा विक्रम मोडीत
Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इतिहास रचलाय. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पटकावण्याचा कारनामा केलाय.
![Ravichandran Ashwin 500 Test Wickets : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास, कसोटीत 500 विकेट्स केल्या पूर्ण; कुंबळे-वॉर्न यांचा विक्रम मोडीत Ravichandran Ashwin 500 Test Wickets IND vs ENG 3rd TEST Anil Kumble Shane Warne Sports News Cricket News Ravichandran Ashwin 500 Test Wickets : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास, कसोटीत 500 विकेट्स केल्या पूर्ण; कुंबळे-वॉर्न यांचा विक्रम मोडीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/16/67d0f8fce44418516d7d7acd5cacd37e1708087938473924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारत आणि इंग्लंडदरम्यान (IND vs ENG) सुरु असलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इतिहास रचलाय. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पटकावण्याचा कारनामा केलाय. अश्विने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जैसी क्राऊलीला बाद करत हा विक्रम नावावर केलाय. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेट पटकावणारा दुसरा भारतीय ठरलाय. यापूर्वी माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी हा कारनामा केला होता.
शेन वॉर्न आणि अनिल कुंबळेंपेक्षा कमी सामने खेळत विक्रम नोंदवला
रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट पटकवणारा दुसरा भारतीय आहे. त्याने 98 सामने खेळत हा विक्रम नावावर केला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान 500 विकेट पटकावण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. त्यांनी 500 विकेट पूर्ण करण्यासाठी केवळ 87 सामने खेळले होते. तर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी 500 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 105 सामने खेळले होते. शेन वॉर्न यांना हा विक्रम नावावर करण्यासाठी 108 सामने खेळावे लागले होते. त्यामुळे रविचंद्रन अश्विनने शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांना मागे टाकले आहे.
After having Zak Crawley caught in Rajkot, Ravichandran Ashwin became the ninth bowler to reach the milestone of 500 Test wickets 🤩
— ICC (@ICC) February 16, 2024
More ➡ https://t.co/wa5VgCRco4 pic.twitter.com/RFoq48rc73
500 विकेट्स पटकवणारा 9 वा गोलंदाज
रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेट पटकावणारा 9 वा गोलंदाज ठरलाय. तर 500 बळी पूर्ण करणारा तो ५ वा फिरकीपटू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त बळी मुरलीधरन यांच्या नावावर आहेत. त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 800 विकेट पटकावल्यात. त्यानंतर शेन वॉर्न यांच्या नावावर 708 विकेट्सची नोंद आहे. तर जेम्स अँडरसन याच्या नावावर 695 विकेट्स आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट्स पटकावण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. त्यांनी 619 विकेट्स पटकावल्या आहेत.
500 विकेट पटकावणारे 9 खेळाडू
1. मुथैय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010) 133 कसोटी सामने - 800 विकेट
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007) 145 कसोटी सामने - 708 विकेट
3. जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2023) 185* कसोटी सामने - 696* विकेट
4. अनिल कुंबळे (भारत 1990-2008) 132 कसोटी सामने - 619 विकेट
5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023) 167 कसोटी सामने- 604 विकेट
6. ग्लेन मैक्ग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007) 124 कसोटी सामने- 563 विकेट
7. कर्टनी वॉल्श (वेस्टइंडीज 1984-2001) 132 कसोटी सामने- 519 विकेट
8. नेथन लायन (ऑस्ट्रेलिया 2011-2023) 127* कसोटी सामने- 517* विकेट
9. रविचंद्रन अश्विन (भारत 2011-2023) 98* कसोटी सामने- 500* विकेट
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)