IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचे भारतास जोरदार प्रत्युत्तर, डकेटच्या शतकाने टीम इंडियाचे टेन्शन वाढवलं
IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीतील दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. सलमीवीर बेन डकेट (Ben Duckett) याने दिमाखदार शतक झळकावत दुसरा दिवस गाजवलाय. त्याने नाबाद राहत 118 चेंडूमध्ये 133 धावा केल्यात.
IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीतील दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. सलमीवीर बेन डकेट (Ben Duckett) याने दिमाखदार शतक झळकावत दुसरा दिवस गाजवलाय. त्याने नाबाद राहत 118 चेंडूमध्ये 133 धावा केल्यात. पहिल्या दिवशी टीम इंडियाकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवींद्र जाडेजाकडून (Ravindra Jadeja) शतकं झळकावल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी दमदार सुरुवात केली आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवस अखेर 207 धावा करत केवळ 2 विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलयं. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडनेही दमदार सुरुवात केली आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट पटकावत इंग्लंडच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले आहे. मात्र, अजूनही भारताकडे 238 धावांची आघाडी आहे.
डकेटच्या शतकाने टीम इंडियाचे टेन्शन वाढवलं
इंग्लंडकडून पहिल्या डावात सलामीवीर बेन डकेटने मैदानावर उतरताच फटकेबाजी सुरु केली आहे. त्याने केवळ 133 चेंडूमध्ये 118 धावा काढल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढलंय. इंग्लंडने दुसऱ्या दिवसात भारताचा 207 धावांचा लीड मोडून काढलाय. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट पटकावत इंग्लंडच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले आहे.
An assertive century from Ben Duckett ensured that England finished strong at the end of the second day's play.#WTC25 | #INDvENG 📝: https://t.co/1EwxUFWYGn pic.twitter.com/qA7Ouwprr0
— ICC (@ICC) February 16, 2024
भारताकडून रोहित-जाडेजाची शतकी खेळी
पहिल्या दिवशी टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाने शतकी खेळी केली. रोहितने 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 196 चेंडूमध्ये 131 धावा केल्या. तर रवींद्र जाडेजाने 225 चेंडूमध्ये 112 धावांची खेळी केली. सरफराज खान रवींद्र जाडेजाच्या शतकाच्या नादात धाव बाद झाला. त्याने 66 चेंडूमध्ये 62 धावा कुटल्या. सरफराज धावबाद झाल्याने कर्णधार रोहित शर्माला राग अनावर झाला होता. त्याने रागात कॅप फेकूनही दिली होती. सरफराज शिवाय ध्रुव जुरेलनेही 46 धावा केल्या. जाडेजा आणि रोहितच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या डावात 445 धावांपर्यंत मजल मारता आली.
मार्क वूडचा आक्रमक मारा
भारताच्या पहिल्या डावात मार्क वूडने आक्रमक मारा केला. त्याने 4 विकेट्स पटकावल्या. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वालला त्याने तंबूत धाडले. शुभमन गिलला त्याने भोपळाही फोडू दिला नाही. मार्क वूड शिवाय रेहान अहमदने 2 विकेट पटकावल्या तर जेम्स अँडरसन, टॉम हर्टली आणि जो रूट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
इतर महत्वाच्या बातम्या
ईशान किशनची बंडखोरी? BCCI च्या रणजी खेळण्यासंदर्भातील फतव्याकडे कानाडोळा, कठोर कारवाईची शक्यता