Ranji Trophy Quarter Finals: पहिल्या दिवशी बंगाल, मुंबई आणि एमपी संघाची दमदार कामगिरी, कर्नाटक-यूपीमध्ये चुरशीची लढत
Ranji Trophy Quarter Finals: रणजी ट्रॉफी 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने आजपासून सुरु झाले असून पहिल्या दिवसाअखेरचे निकाल काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Ranji Trophy Knock out Stage: रणजी ट्रॉफी 2022 (Ranji Trophy 2022) स्पर्धेच्या नॉक आऊट सामन्यांना आजपासून (6 जून) सुरुवात होणार आहे. 4 सामन्यांत 8 संघ एकमेंकाविरुद्ध भिडत आहेत. चार दिवसीय सामन्यांच्या या मॅचमध्ये पहिल्या दिवशी काही संघानी दमदार कामगिरी केली. तर पहिल्या दिवसाअखेरचे निकाल काय आहेत ते पाहूया...
क्वॉर्टर फायनल 1 : बंगाल विरुद्ध झारखंड (Bengal vs Jharkhand)
झारखंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. झारखंडचा कर्णधार सौरभ तिवारीचा हा निर्णय़ मात्र संघाला महाग पडला. बंगालने फलंदाजी करताना दमदार खेळ दाखवत पहिल्या दिवसाखेर केवळ 1 विकेट गमावून 310 रन केले आहेत. सुदीप कुमारने शानदार शतक ठोकलं आहे.
क्वॉर्टर फायनल 2 : मुंबई विरुद्ध उत्तराखंड (Mumbai vs Uttarakhand)
मुंबई संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. त्यानंतर मुंबईकरांनी चांगली फलंदाजी करत दिवसअखेर तून विकेट गमावत 304 रन केले आहेत. यावेळी सुवेद परकारने शानदार शतक ठोकलं आहे.
क्वॉर्टर फायनल 3 : कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश (Karnataka vs Uttar Pradesh)
उत्तर प्रदेशचा कर्णधार करण शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. कर्नाटक टीमने दिवसखेर 7 विकेट्स गमावत 213 रन केले असल्याने उत्तर प्रदेश संघाची कामगिरी बऱ्यापैकी सरस ठरली आहे. यावेळी शिवम मावीने 3 आणि सौरभ कुमारने 4 विकेट घेतले.
क्वॉर्टर फायनल 4 : पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश (Punjab vs Madhya Pradesh)
आयपीएलमधील स्टार खेळाडूंचा भरणा असलेली पंजाब टीम रणजी स्पर्धेत मात्र पहिल्या दिवसखेर 219 रनवर ऑलआउट झाली. कर्णधार अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रीत यांनी केवळ प्रत्येकी 47 धावांची खेळी केली. शुभमन गिल आणि मंदीप सिंह सारखे खेळाडू मात्र फेल ठरले. दरम्यान मध्य प्रदेश संघाने पहिल्या डावाची सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा-