Ranji Trophy 2022 Knockouts: रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचं नवं वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?
Ranji Trophy 2022 Knockouts: भारतीय नियामक मंडळानं शनिवारी रणजी ट्रॉफी 2022 नॉकआऊट सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलंय.
Ranji Trophy 2022 Knockouts: भारतीय नियामक मंडळानं (BCCI) शनिवारी रणजी ट्रॉफी 2022 नॉकआऊट सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलंय. त्यानुसार या स्पर्धेतील नॉकआऊट सामने दोन दिवस उशिरानं खेळवण्यात येणार आहेत. येत्या सहा जूनपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. तर, स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 22 जून रोजी खेळला जाईल.
आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यापूर्वी रणजी ट्रॉफीचे साखळी सामने खेळवले गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रणजी ट्रॉफीचा यंदाचा हंगाम उशिरानं सुरू झाला. यंदाच्या हंगामात बंगाल, झारखंड, मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या संघांनी नॉकआऊट फेरीत स्थान पक्कं केलंय. दरम्यान, रणजी ट्रॉफी 2022 च्या नॉकआऊट फेरीच्या सुधारित वेळापत्रकावर एक नजर टाकुयात.
उपांत्यपूर्व फेरीतील सामने 6 जून- 10 जून दरम्यान खेळले जाणार
सामना | संघ |
पहिला उपांत्यपूर्व सामना | बंगाल विरुद्ध झारंखड |
दुसरा उपांत्यपूर्व सामना | मुंबई विरुद्ध उत्तराखंड |
तिसरा उपांत्यपूर्व सामना | कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश |
चौथा उपांत्यपूर्व सामना | पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश |
उपांत्यपूर्व फेरीतील सामने संपल्यानंतर 14 जून ते 18 जून दरम्यान उपांत्य फेरीचं सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर स्पर्धेतील अंतिम सामना 22 जून ते 26 जून दरम्यान खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा-