(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Order of the British Empire: चेन्नईच्या स्टार फलंदाजाला मिळाला 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर'चा पुरस्कार
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आणि चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार फलंदाज मोईन अलीला (Moeen Ali) क्रिकेटमधील योगदानबद्दल 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश' (Order of the British Empire) एम्पायरचा पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
Order of the British Empire: इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आणि चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार फलंदाज मोईन अलीला (Moeen Ali) क्रिकेटमधील योगदानबद्दल 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश' (Order of the British Empire) एम्पायरचा पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. मोईन अलीनं दिर्घकाळ इंग्लंडसाठी तिन्ही फॉरमेटमध्ये क्रिकेट खेळलं आहे. परंतु, अलिकडचं त्यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते.
द गार्जियन आणि पीए मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडसाठी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल मोईन अलीला ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. क्वीन्स बर्थडे ऑनर्समध्ये त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. मोईन अलीनं गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन केवळ मर्यादीत षटकाच्या फॉरमेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमधील सर्वात मजबूत संघापैकी एक असलेल्या चेन्नईच्या संघाचा मोईन अली महत्वाचा खेळाडू आहे. त्यानं आपल्या जोरावर चेन्नईच्या संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
मोईन अली काय म्हणाला?
"हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या प्रदर्शनानं माझे आई-वडिलांना अभिमान वाटतो तर, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. याशिवाय, मला माझ्या चाहत्यांकडून प्रोत्साहन मिळालं. ज्यामुळं मी माझ्या फलंदाजीत सुधारणा करू शकलो."
मोईन अलीची कसोटी कारकिर्द
मोईन अलीनं 2014 साली श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 64 कसोटीत 5 शतक, 14 अर्धशतकांसह 2 हजार 914 धावा केल्या आहेत. त्याच्या फलंदाजीची सरासरी 28.29 इतकी आहे. गोलंदाजीत मोईन अलीनं 195 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्यानं 13 वेळा चार आणि पाच वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. तर एका कसोटीत 10 विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
हे देखील वाचा-