R Ashwin Test Records: चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात अश्विननं टिपल्या 6 विकेट्स, दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा 'हा' रेकॉर्ड मोडला
R Ashwin : भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याचा एक खास रेकॉर्ड आज रविचंद्रन अश्विन यानं तोडला आहे.

Ashwin Record : भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या (IND vs AUS 4th Test) पहिल्या डावात एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. अश्विननं एका डावात 6 विकेट्स घेत आणखी एक 5 Wickets Haul हाऊल अर्थात एका डावात पाच विकेट घेण्याचा खास रेकॉर्ड केला आहे. अश्विननं 26 व्या वेळेस घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात एका डावात 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. त्याने अनिल कुंबळेचा घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोडला. कुंबळेनं ही कामगिरी 25 वेळा केली होती. विशेष म्हणजे अश्विननं 55 वा कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळताना ही कामगिरी केली असून कुंबळेने ही कामगिरी 63 सामन्यात केली होती.
या दिग्गजांना टाकू शकतो मागे
अश्विननं कुंबळेला मागे टाकलं असलं तरी आणखी काही दिग्गज खेळाडूंना तो मागे टाकू शकतो. यामध्ये श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या खूप पुढे असून त्याने 45 वेळा ही कामगिरी केली आहे. तसंच श्रीलंकेचा आणखी एक फिरकी गोलंदाज रंगना हेराथने 26 वेळा ही कामगिरी केली असून अश्विन आणखी एकदा ही कामगिरी करुन त्याला मागे टाकू शकतो. तसंच इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने 32 वेळा ही कमाल केली असून त्यालाही अश्विन मागे टाकू शकतो.
आणखी एक रेकॉर्डही मोडू शकतो
अश्विन लवकरच आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम करू शकतो. तो भारतीय मैदानावर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनू शकतो. सध्या हा विक्रम भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नावावर आहे. आर अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (BGT 2023) अंतर्गत चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात घेतलेल्या 6 विकेट्समुळे त्याच्या विकेट्सची संख्या 472 वर पोहोचवली असून घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्याने घेतलेल्या विकेट्सची संख्या 335 वर गेली आहे. भारतात अनिल कुंबळेने 63 कसोटी सामन्यांच्या 115 डावात 350 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय मैदानावर तो बऱ्याच काळापासून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज म्हणून विराजमान आहे. आता अश्विन हा विक्रम मोडण्यापासून फक्त 15 विकेट्स दूर आहे. पुढील 7 ते 8 सामन्यांमध्ये अश्विन हा मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
हे देखील वाचा-




















