एक्स्प्लोर

IND vs AUS : पंजाब क्रिकेटकडून युवराज आणि हरभजनला मोठं गिफ्ट, मोहाली स्टेडियममध्ये दोघांच्या नावाच्या पॅव्हेलियनचं उद्घाटन

Yuvraj Singh : पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्या नावाने आयएस बिंद्रा स्टेडियमवर पॅव्हेलियनचं उद्घाटन केलं आहे.

Yuvraj Singh Pavellion in Mohali :  ारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यात सुरु तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मैदानात सुरु आहे. या सामन्यापूर्वीच पंजाब क्रिकेटकडून भारतीय संघाचे माजी खेळाडू  युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांना मोठी भेटवस्तू दिली आहे. मैदानात दोघांची नावं पॅव्हेलियनला देण्यात आली आहेत.

भज्जी आणि युवीला खास गिफ्ट

पंजाब क्रिकेट असोसिएशनने पॅव्हेलियनला युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांचे नाव देत दोघांनाही एक मोठी भेट दिली आहे. युवराज आणि हरभजन हे दोघेही भारताने जिंकलेल्या 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या विजयी भारतीय संघाचे सहभागी आहेत. दोघांनी या स्पर्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2011 विश्वचषकाचा हिरो असणारा युवराज मालिकावीरही होता. तर हरभजन भारतासाठी विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत टॉप खेळाडूंमध्ये आहे. दोघेही पंजाब राज्याचे खेळाडू असून भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांची नावं पॅव्हेलियनला देण्यात आली आहेत. दरम्यान आज झालेल्या स्टेडियममधील पॅव्हेलियनच्या नावाच्या उद्घाटनावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह स्वतः तेथे उपस्थित होता. पीसीएने स्टेडियममधील टेरेस ब्लॉकचे नाव हरभजनच्या नावावर ठेवले आहे तर स्टेडियमच्या नॉर्थ पॅव्हेलियनला युवराज सिंहचे नाव दिले आहे. 

ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान

सामन्यात सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती कांगारुनी आखली होती. त्या हेतूने त्यांची सुरुवातही चांगली झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (11), माजी कर्णधार विराट कोहली (2), दोघेही स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने केएल राहुलसोबत डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या 100 पार नेली. पण अर्धशतक करुन राहुल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दीक पंड्या क्रिजवर आल्यावर त्यानेही चांगली फलंदाजी केली. पण तोवर सूर्या 46 धावा करुन बाद झाला. मग हार्दीकने एकहाती तुफान फलंदाजी करत 30 चेंडूत नाबाद 71 धावा ठोकल्या आणि धावसंख्या 208 पर्यंत नेत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Embed widget