(Source: ECI/ABP News/ABP Majha)
U20 World Championships: अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतानं 16 पदकं जिंकली, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुकाचा वर्षाव
U20 World Championships: नायरोबी येथे पार पडलेल्या अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतानं चांगली कामगिरी करून दाखवलीय.
U20 World Championships: नायरोबी येथे पार पडलेल्या अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतानं चांगली कामगिरी करून दाखवलीय. या स्पर्धेत भारताच्या कुस्तीपटूंनी दमदार प्रदर्शन करत भारताच्या झोळीत 16 पदकं टाकली आहेत. महिला आणि भारताच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये 7-7 पदंक आपल्या नावावर केली. तर, ग्रीको रोमनमध्येही दोन पदकं जिंकली. अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सर्व कुस्तीपटूंवर कौतूकाचा वर्षाव केलाय.
नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?
अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी ट्विट करताना नरेंद्र मोदी म्हणाले,"भारताच्या कुस्तीपटूंमुळं पुन्हा एकदा आम्हाला अभिमानास्पद वाटत आहे. अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 16 पदके (पुरुष आणि महिला फ्रीस्टाइलमध्ये प्रत्येकी 7 आणि ग्रीको-रोमनमध्ये 2) जिंकल्याबद्दल आमच्या टीमचं अभिनंदन. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. हे भारतीय कुस्तीचे भवितव्य सुरक्षित हातात असल्याचे देखील दर्शवते!”
नरेंद्र मोदींचं ट्वीट-
अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतानं 16 पदकं जिंकली
अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतानं अप्रतिम कामगिरी केलीय. नैरोबी येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्तीपटूंनी अप्रतिम खेळ दाखवत 16 पदकं जिंकली.भारतानं महिला आणि पुरुष फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये 7-7 पदकं जिंकली. ग्रीको-रोमनमध्ये 2 पदकं जिंकली. अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंची दमदार कामगिरी
नुकतीच बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात भारतानं दमदार खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय. या स्पर्धेत भारतानं 22 सुवर्णपदकासह एकूण 61 पदकं जिंकली. महत्वाचं म्हणजे, या स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टिंग आणि कुस्तीपटूंनी चांगली दमदार प्रदर्शनाच्या जोरावर जगावर छाप सोडली. भारतानं कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेत एकूण 12 पदकं जिंकली आहेत.
हे देखील वाचा-