Pakistan Cricket : कर्णधार विना पाकिस्तान जाणार विदेशी दौऱ्यावर; 1-2 नाही तर 4 संघाची केली घोषणा
Pakistan squad for Australia-Zimbabwe Tour : पाकिस्तानी संघाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे.
![Pakistan Cricket : कर्णधार विना पाकिस्तान जाणार विदेशी दौऱ्यावर; 1-2 नाही तर 4 संघाची केली घोषणा PCB Announces Pakistan ODI And T20I Squad For Australia And Zimbabwe Tour Without Captain Babar Azam Shaheen Afridi Cricket News Marathi Pakistan Cricket : कर्णधार विना पाकिस्तान जाणार विदेशी दौऱ्यावर; 1-2 नाही तर 4 संघाची केली घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/27/788b71a317b5045fbad9c1162536e31917300260416581091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PCB announces squads for Australia Zimbabwe Tours : पाकिस्तानी संघाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चार संघांची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे पीसीबीने चारही संघात एकाही खेळाडूला कर्णधार बनवलेले नाही. काही काळापूर्वी बाबर आझमने मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडले होते. पीसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी रविवारी दुपारी 3.30 वाजता लाहोरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करतील. ज्यामध्ये मर्यादित षटकांच्या नवीन कर्णधाराबद्दल माहिती दिली जाईल. ऑस्ट्रेलिया दौरा 4 ते 18 नोव्हेंबर दरम्यान चालेल, तर झिम्बाब्वे सामने 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत बुलावायो येथे खेळवले जातील.
बाबर आझम, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले होते. आता तिन्ही खेळाडू वनडे संघात परतले आहेत. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असेल. एकदिवसीय संघातील अनकॅप्ड खेळाडूंमध्ये आमिर जमाल, अराफत मिन्हास, फैसल अक्रम, हसीबुल्ला, मुहम्मद इरफान खान आणि सॅम अयुब यांचा समावेश आहे. जहाँदाद खान आणि सलमान अली आगा पहिल्यांदाच टी-20 संघात सामील झाले आहेत.
चॅम्पियन्स वन-डे कप फास्ट बॉलर मोहम्मद हसनैन, ज्याने गेल्या महिन्यात फैसलाबादमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या, तो देखील एकदिवसीय संघात परतला आहे. जो जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानकडून शेवटचा खेळला होता. एकदिवसीय संघाचे सात खेळाडू बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी 28 ऑक्टोबरला मेलबर्नला पोहोचतील. तर उर्वरित खेळाडू 29 ऑक्टोबरला रवाना होतील.
🚨 Announcing Pakistan's squads for the Australia and Zimbabwe tours 🚨
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2024
Read more ➡️ https://t.co/vzc7iFBINJ#AUSvPAK | #ZIMvPAK pic.twitter.com/l66VW259EA
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानी संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफात मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसिबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दौऱ्यावर टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानी संघ : अराफत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसिबुल्लाह, जहांदद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमेर बिन युसूफ, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मोकीम, उस्मान खान.
झिम्बाब्वे दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानी संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद डॅनियल, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसीबुल्लाह, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, मोहम्मद इरफान खान, सईम अयुब, सलमान अली आगा, शाहनवाज डहानी आणि तय्यब ताहिर
झिम्बाब्वे दौऱ्यावर टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानी संघ : अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हारिस रौफ, हसिबुल्लाह, जहांदद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, सुफियान मोकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)