PAK vs SL, 1st Innings : पाकिस्ताननं रचला 252 धावांचा डोंगर, श्रीलंकेची रणनिती काय असेल?
Pakistan vs Sri Lanka, Asia Cup 2023 : पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत 252 धावांचा डोंगर रचला आहे. आता श्रीलंका हे लक्ष्य कसं पूर्ण करत हे पाहावं लागणार आहे.
![PAK vs SL, 1st Innings : पाकिस्ताननं रचला 252 धावांचा डोंगर, श्रीलंकेची रणनिती काय असेल? Pakistan vs Sri Lanka first inning Asia Cup 2023 pakistan given target of 253 runs to sri lanka PAK vs SL, 1st Innings : पाकिस्ताननं रचला 252 धावांचा डोंगर, श्रीलंकेची रणनिती काय असेल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/14/cd52e638edd26e5992cbbeef6624ccb41694706809804625_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोलंबो : पाकिस्तान (Pakistan) ने श्रीलंका (Sri Lanka) विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत 252 धावांचा पल्ला गाठला आहे. आता श्रीलंका संघाला विजयासाठी 253 धावांचा डोंगर (Sri Lanka vs Pakistan) रचावा लागणार आहे. आशिया कप 2023 मध्ये आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 मधील सामना सुरु आहे. कोलंबोमध्ये सुरु असलेल्या सामन्यात पावसामुळे व्यत्य आला. त्यामुळे ओव्हर कमी करुन हा 42 षटकांचा सामना खेळवण्यात येत आहे. रिझवानच्या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने 42 षटकांत 252 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने 42 षटकांत 7 विकेट गमावून 252 धावा केल्या आहेत.
रिझवानच्या शानदार फलंदाजीसह पाकिस्तानच्या 252 धावा
पाकिस्तानकडून या सामन्यात मोहम्मद रिझवानने 73 चेंडूत 86 धावांची शानदार नाबाद खेळी खेळी केली. याशिवाय शफीकने 52 धावांची तर इफ्तिखारने 47 धावा करत संघासाठी मोलाचं योगदान दिलं. श्रीलंकेकडून दमदार गोलंदाजी करत महिशा पाथिरानाने तीन तर मदुशनने दोन बळी घेतले. आता श्रीलंकेला डीएल पद्धतीने 42 षटकांत 252 धावांचे आव्हान आहे.
सामन्यावर पावसाचं संकट
अद्यापही कोलंबोमध्ये ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे आधीच सामना उशिरा सुरू झाला त्यानंतर मधेच पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबवण्यात आला होता. अजूनही या सामन्यावर पावसाचं संकट घोंघावत आहे. आजच्या सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात येईल. असे झाल्यास जास्त रन रेट असणारा संघ फायनलमध्ये पोहोचेल. श्रीलंकेचा रन रेट पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. त्यामुळे श्रीलंकेसाठी हे फायदेशीर ठरेल.
आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत कोण पोहोचणार?
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजयी संघ आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचेल. आशिया कपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने आधीच स्थान मिळवलं आहे. त्यामुळे श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या आजच्या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत टीम इंडियाच्या विरोधात मैदानावर उतरेल. आशिया चषकातील अंतिम सामना 17 सप्टेंबर 2023 रोजी कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे.
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन
पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, महिश तीक्षणा, प्रमोद मदुशन, महिशा पाथिराना.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन
फखर जमान, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, जमान खान.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
MS Dhoni : आजच्याच दिवशी धोनीनं कर्णधारपदाची धुरा सांभाळली, 'कॅप्टल कूल'चा हा रेकॉर्ड आजही कायम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)