MS Dhoni : आजच्याच दिवशी धोनीनं कर्णधारपदाची धुरा सांभाळली, 'कॅप्टल कूल'चा हा रेकॉर्ड आजही कायम
Dhoni Captaincy : 14 सप्टेंबर 2007 रोजी महेंद्र सिंह धोनीने कर्णधार म्हणून पहिला सामना खेळला होता. त्याच्या 10 दिवसांनंतर टीम इंडियाने पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
मुंबई : भारतीय संघाचा (Team India) सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनीचं (MS Dhoni) नाव घेतलं जातं. धोनीच्या नेतृत्वात (Dhoni Captaincy) टीम इंडियाने इतिहास रचला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप आणि वनडे कपही जिंकला आहे. यासोबत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीही आपल्या नावे केली. धोनीने आजच्याची दिवशी टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पहिला सामना खेळला होता. 2007 मध्ये धोनीला क्रिकेटच्या सर्व प्रकारातील टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि 2017 पर्यंत त्याने कर्णधारपदाची भूमिका बजावली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी आयपीएलमध्ये त्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतो.
आजच्याच दिवशी धोनीनं कर्णधारपदाची धुरा सांभाळली,
आजच्याच दिवशी म्हणजेच, 14 सप्टेंबर 2007 साली धोनीने कर्णधार म्हणून पदार्पण केलं होतं. 2007 मध्ये धोनीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात (India and Pakistan in ICC T20 World Cup 2007) पहिल्यांदा टीम इंडियाचा कर्णधार म्हणून धुरा सांभाळली होती. यानंतर 'कॅप्टन कूल'ची पावर सगळ्यांनी पाहिली आहे. यानंतर 10 दिवसांनी टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्त्वात पाकिस्तानचा पराभव करत भारत पहिल्यांदा टी-20 चॅम्पियन ठरला.
MS Dhoni captained for the first time "On this Day in 2007" & rest is history:
— Johns. (@CricCrazyJohns) September 14, 2023
T20 World Cup in 2007
Test mace in 2010
IPL in 2010
CLT20 in 2010
Asia Cup in 2010
World Cup in 2011
Test mace in 2011
IPL in 2011
Champions Trophy in 2013
CLT20 in 2014
Asia Cup in 2016
IPL in 2018… pic.twitter.com/kMxI6AvrnD
कर्णधार म्हणून धोनीचे विक्रम
भारताने धोनीच्या नेतृत्वात 2010 आणि 2016 आशिया चषक, ICC क्रिकेट विश्वचषक 2011 आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 यासह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या. धोनीचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. धोनीने 199 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. यापैकी 110 सामने भारताने जिंकले, 74 गमावले आणि 5 बरोबरीत राहिले. कसोटी क्रिकेटच्या 60 सामन्यांमध्ये धोनीने भारताचं नेतृत्व केलं, यातील 27 सामने त्यांने जिंकले, 18 गमावले आणि 15 अनिर्णित राहिले.
तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार
भारताने 2013 मध्ये आजच्याच दिवशी इंग्लंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पावसांमुळे रोमांचक ठरलेला हा सामना टीम इंडियाने पाच धावांनी जिंकला आणि धोनी तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2011 आणि टी-20 वर्ल्ड कप 2007 ही जिंकला. अद्याप कोणत्याही भारतीय कर्णधाराला ही कामगिरी करता आलेली नाही. 'कॅप्टल कूल'चा हा रेकॉर्ड आजही कायम आहे.