एक्स्प्लोर

विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या शिलेदारांची घोषणा, हसन अलीचे कमबॅक, नसीम शाहचा पत्ता कट

Pakistan Squad ODI World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी वनडे विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे.

Pakistan Squad ODI World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी वनडे विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघामध्ये हसन अली याचे कमबॅक झालेय. जवळपास दीड वर्षांनतर हसन अलीने पाकिस्तान संघात कमबॅक केले आहे.

दुखापतीमुळे नसीम शाह विश्वचषक स्पर्धेला मुकणार आहे. आशिया चषक स्पर्धेत नसीम शाह याला दुखापत झाली.  शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि सलमान आगा पाकिस्तान संघाचा भाग आहेत.  शादाब खान याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आले. पाकिस्तानच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत नसीम शाहचा समावेश आहे. मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर गेला आहे. शुक्रवारी पाकिस्तानने संघाची घोषणा केली. नसीम शाह याच्या अनुपस्थितीत संघाने हसन अली याच्यावर विश्वास दाखवला आहे. हसन अलीने जवळपास दीड वर्षाने संघात कमबॅक केलेय. जानेवारी २०२२ मध्ये हसन अली याने अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो पाकिस्तान संघाबाहेरच आहे.  हसन अली याने 60 वनडे सामन्यात 91 विकेट घेतल्या आहेत.   

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हटके अंदाजात विश्वचषकात खेळणाऱ्या संघाची घोषणा केली. पीसीबीने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावर व्हिडीओ पोस्ट करत संघाची घोषणा केली. 

कर्णधार बाबर आझमसह फखर जमान, इमाम-उल-हक आणि मोहम्मद रिझवान हे देखील संघात आहेत. इफ्तिखार अहमद आणि सलमान आगा यांच्यावरही निवड समितीने विश्वास व्यक्त केला आहे. युवा खेळाडू मोहम्मद हॅरीस आणि सौद शकील हे देखील संघात आहेत. आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तानची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. बाबारच्या नेतृत्वातील संघाला आशिया चषकाच्या अंतिम फेरीतही पोहोचता आले नाही. पण आता नव्या रणनीतीसह २०२३ च्या विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झालाय. फहीम अश्रफ याला संघात जागा मिळवता आली नाही.

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तानचे शिलेदार -

फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, शादाब खान, उसामा मीर, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, हसन अली.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : 1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं!Vijay Wadettiwar Full PC : सरकारकडून शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी,  विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीकाSanjay Raut on Victory Parade Bus:गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? :संजय राऊतRohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Embed widget