PAK vs NAM, Match Highlights: नामिबियाला पराभूत करून पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक
PAK vs NAM, Match Highlights: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असे दोनच संघ आहेत, जे इंग्लंडला मात देऊ शकतात असे इंग्लंडच्या माजी कर्णधार केविन पीटरसनने म्हंटलंय.
ICC T20 WC 2021, PAK vs NAM: टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतोय. आज अबुधाबीच्या शेख झायेद (Sheikh Zayed Stadium) मैदानावर नामिबियाला पराभूत करून पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये धडक दिली. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान आक्रमक खेळीमुळे पाकिस्तानच्या पाकिस्तानने 20 षटकात 2 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नामिबियाचा संघाचा 45 धावांनी पराभव झाला.
नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाकडून सलामीवीर मोहम्मद रिझवानने 50 बॉलमध्ये नाबाद 79 धावा तर, बाबर आझमने 49 बॉलमध्ये 70 धावा केल्या. बाबर आऊट झाल्यानंतर फकार झमान 5 बॉलमध्ये 5 धावा करून माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद हाफीजने 16 बॉलमध्ये 32 धावा केल्या. ज्यामुळे पाकिस्तानच्या संघाला 20 षटकात 2 विकेट्स गमावून 189 धावा करता आल्या. नामिबियाकडून डेव्हिड विसे आणि जॅन फ्रायलिंक यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या नामिबियाचा संघ सुरुवातीपासून डगमगताना दिसला. स्टीफन बार्ड (29 बॉल 29 धावा), मायकेल व्हॅन लिंजेन (2 बॉल 2 धावा), क्रेग विल्यम्स (37 बॉल 40 धावा), गेरहार्ड इरास्मस (10 बॉल 15), डेव्हिड विसे ( 31 बॉल 43 धावा, नाबाद), जेजे स्मित (5 बॉल 2 धावा), जॅन निकोल लोफ्टी-ईटनने नाबाद 7 धावा केल्या. ज्यामुळे नामिबियाचा संघाला 20 षटकात 5 विकेट्स गमावून 144 धावापर्यंत मजल मारता आली.
या विजयासह पाकिस्तानच्या संघाचे 8 गुण झालेत. तसेच नामिबियाला पराभूत करून पाकिस्तानच्या संघाने सेमीफायनलमध्ये धडक दिली. याशिवाय, टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. इंग्लंडने सलग चार सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलंय. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकासाठी इंग्लंडला प्रमुख दावेदार मानलं जातंय. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असे दोनच संघ आहेत, जे इंग्लंडला मात देऊ शकतात असे इंग्लंडच्या माजी कर्णधार केविन पीटरसनने म्हंटलंय.