T20 World Cup 2021: बाबर आझमचा आणखी एक पराक्रम, नामिबियाविरुद्ध अर्धशतक झळकावून मोडला विराट कोहलीचा विक्रम
Babar Azam breaks Virat Kohli’s record: बाबर आझमने अवघ्या 27 व्या डावात कोहलीला ओव्हरटेक करुन हा पराक्रम रचलाय.
टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) पाकिस्तानच्या संघाने चांगली कामगिरी करून दाखवलीय. पाकिस्तानच्या संघाने भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला पराभूत गुणतालिकेत अव्वल स्थानी गाठलंय. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमी (Babar Azam) चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. आज शेख जायद मैदानात (Sheikh Zayed Stadium) नामिबियाविरुद्ध बाबर आझमने आणखी एक पराक्रम केलाय. या सामन्यात बाबर आझमने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडलाय.
नामिबिया विरुद्ध पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बाबर आझमने 39 बॉलमध्ये 50 धावा करून नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. टी-20 क्रिकेटमधील बाबर आझमचं हे चौदावं शतक असून त्याने विराटचा विक्रम मोडीत काढलाय. विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 13 वेळा 50 हून अधिक धावा केल्यात. विश्वचषकात भारताचे आणखी 3 सामने उरले आहेत. या 3 सामन्यात विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी केली तर विक्रम पुन्हा एकदा त्याच्या नावावर होईल.
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक 50 हून धावा केल्याच्या यादीत बाबर अव्वल स्थानी पोहचलाय. त्याने 27 सामन्यातच 14 अर्धशतकं केलीत. त्यानंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 44 सामन्यात 13 अर्धशतके ठोकली. या यादीत केन विलियमसन्सचा तिसरा क्रमांक लागतो. त्याने 50 सामन्यात 11 अर्धशतकं झळकावलीय. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच चौथ्या तर, इंग्लंड इयॉन मॉर्गनने पाचव्या क्रमांकावर आहे. आरोनने 51 सामन्यात 11 आणि मॉर्गनने 60 सामन्यात 9 अर्धशतकं केली.
पाकिस्तान आणि नामिबिया प्लेईंग इलेव्हन
पाकिस्तान संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
नामिबिया संघ- स्टीफन बार्ड, क्रेग विल्यम्स, मायकेल व्हॅन लिंगेन, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), जेन निकोल लॉफी-ईटन, जेन ग्रीन (यष्टीरक्षक), डेव्हिड वीज, जेजे स्मिट, जेन फ्रीलिंक, रुबेन ट्रम्पेलमन आणि बेन शिकोंगो.
संबंधित बातम्या-
- IND vs AFG: भारत उद्या अफगाणिस्तानशी भिडणार, संभाव्य संघ आणि पिच रिपोर्ट घ्या जाणून
- Ind vs NZ T20 Series: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत केएल राहुल भारताचे नेतृत्व करणार?