Hardik Pandya Retirement: हार्दिक पांड्या लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं कारण
Hardik Pandya Retirement: हार्दिक पांड्याला मागील काही महिन्यांपासून फिटनेसच्या समस्येचा त्रास सहन करावा लागतोय.
Hardik Pandya, India Tour Of South Africa, Hardik Pandya News, Hardik Pandya retirement
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) लवकरच कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती जाहीर करू शकतो. हार्दिक पंड्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. त्याला आपलं संपूर्ण लक्ष एकदिवसीय (ODI) आणि टी-20 क्रिकेटवर (T-20) केंद्रीत करायचं आहे, असं बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्यानं सांगितलंय.
हार्दिक पांड्याला मागील काही महिन्यांपासून फिटनेसच्या समस्येचा त्रास सहन करावा लागतोय. यामुळं आयपीएलच्या मागील हंगामात हार्दिक पांड्यानं गोलंदाजी केली नव्हती. एवढेच नव्हे तर फिटनेसमुळं त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं नुकतीच एका क्रिकेट वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत अधिकाऱ्यानं सांगितलं की, "हार्दिक गेल्या काही महिन्यांपासून फिटनेसच्या समस्येचा सामना करतोय. मात्र, त्यानं अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, तो कसोटी क्रिक्रेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. कारण, त्याला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. हार्दिक पांड्यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर, भारतीय संघाचं मोठे नुकसान असेल. तसेच आम्हाला बॅकअप तयार करावा लागेल", असंही अधिकाऱ्यानं म्हटलंय.
हार्दिक पांड्यानं भारतीय संघाकडून श्रीलंकाविरुद्ध 26 जुलै 2017 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानं एक शतकाच्या साहाय्यानं 532 धावा केल्या आहेत. तर, 17 विकेट्स घेतल्या आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
Team India Announced : वन-डेचं कर्णधारपद आणि कसोटीचं उपकर्णधारपद रोहित शर्माकडे