Team India Announced : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माकडे एकदिवसीय-टी20 संघाचं कर्णधारपद
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यासाठी भारताने नुकताच संघ जाहीरल केला आहे.
Team India Announced : भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटच्या शिरकावामुळे दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना वेळापत्रकात थोडा बदल करुन दौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान दौऱ्यासाठी भारतीय संघाने आपला संघ जाहीर केला असून यावेळी रोहित शर्माचं प्रमोशन झाल्याचं पाहायला मिळत आहे. रोहितला टी20 नंतर आता एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही मिळालं आहे. तर कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणूनही रोहित काम पाहणार आहे.
द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
स्टँड बाय प्लेअर - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जान नागव्सल्ला
असा असेल दौरा
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...
कसोटी सामन्यांचे वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना - 26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.
- दुसरा कसोटी सामना - 3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.
- तिसरा कसोटी सामना - 11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन
एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक
- पहिला एकदिवसीय सामना - 19 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
- दुसरा एकदिवसीय सामना - 21 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
- तिसरा एकदिवसीय सामना - 23 जानेवारी, 2022, न्यू लँड्स, केपटाऊन
हे देखील वाचा-
- न्यूझीलंडला 372 धावांनी नमवूनही WTC रँकिगमध्ये भारत अव्वल नाही, पाकिस्तान-श्रीलंका क्रिकेट संघ आहे कारण
- IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत अनोखा विक्रम, 132 वर्षांपूर्वी दोन सामन्यात होते 4 कर्णधार
- IND vs NZ 2nd Test : मूळ मुंबईकर गोलंदाजानं वानखेडेवर टीम इंडियाची उडवली दाणादाण! दिग्गजांना गुंडाळलं...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha