एक्स्प्लोर

Yashasvi Jaiswal : अजिंक्य रहाणेची एक फटकार आणि यशस्वी जैस्वालचं किक्रेटमधील आयुष्य बदलून गेलं! काय होता तो प्रसंग?

यशस्वी जैस्वालने 12 जुलै 2023 पासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने 171 धावांची खेळी खेळली. त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

Yashasvi Jaiswal : दुलीप ट्रॉफीच्या फायनल कोईम्बतूरमध्ये पार पडली. हा सामना पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात झाला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने हा सामना 294 धावांनी जिंकला. या सामन्यात यशस्वी जैस्वालही खेळत होता. पहिल्या डावात केवळ 1 धावा करणाऱ्या जयस्वालने दुसऱ्या डावात 265 धावा केल्या. या कारणामुळे त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' देण्यात आला. हा सामना क्रिकेटच्या इतिहासाच्या पानात नोंदला गेला तो निकाल आणि त्याच्या चमकदार कामगिरी तसेच यशस्वीच्या वागण्यामुळे. पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या संघातील खेळाडू यशस्वी जयस्वालला मैदानाबाहेर पाठवले. यशस्वी जैस्वालच्या अनुशासनहीन वृत्तीमुळे रहाणेला हे पाऊल उचलावे लागले.

यशस्वी वारंवार दक्षिण विभागाच्या फलंदाजांची, विशेषतः रवी तेजाची स्लेजिंग करत होता. पंचांनी यशस्वीला दोन-तीन वेळा ताकीदही दिली होती. डावाच्या 57 व्या षटकात यशस्वीने पुन्हा तेच केले तेव्हा पंचांनी कर्णधार रहाणेशी बराच वेळ संभाषण केले, त्यानंतर यशस्वीला मैदान सोडावे लागले. विशेष बाब म्हणजे पंचांनी पश्चिम विभागाला पर्यायी क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी दिली नाही, ज्यामुळे त्यांना काही षटकांसाठी 10 खेळाडूंसह मैदानात राहावे लागले.

अजिंक्यच्या या भूमिकेचा यशस्वीवर चांगलाच परिणाम झाल्याचे मानले जाते. त्याच्या कारकिर्दीतही बरेच बदल झाले. ते वर्ष होते 2022. IPL 2022 च्या 10 सामन्यांमध्ये 25.80 च्या वेगाने 258 धावा करणाऱ्या यशस्वीने पुढच्याच वर्षी म्हणजेच IPL 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली. आयपीएल 2023 मध्ये यशस्वी जैस्वालने 14 सामन्यात 625 धावा केल्या. या काळात त्याची सरासरी 48.08 आणि स्ट्राइक रेट 1632.61 होता.

टीम इंडियात पुन्हा एकदा निवड झाली

यशस्वी जैस्वालला आयपीएल 2023 मध्ये कामगिरी केल्याबद्दल बक्षीस मिळाले. यानंतर यशस्वी जैस्वालने 12 जुलै 2023 पासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने 171 धावांची खेळी खेळली. त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. नंतर त्याच दौऱ्यावर त्याने टी-20 मध्ये पदार्पण केले.

भदोहीहून मुंबई गाठण्यासाठी यशस्वीच्या संघर्षाची कहाणी

भदोहीहून मुंबईत पोहोचलेल्या यशस्वीची कहाणी अतिशय हृदयस्पर्शी आहे. तो एका दुध डेअरीत काम करायचा आणि पाणीपुरीह सुद्धा विकत होता. 28 डिसेंबर 2001 रोजी भदोही, यूपी येथे जन्मलेला यशस्वी वयाच्या 12व्या वर्षी मुंबईत पोहोचला आणि आझाद मैदानावर क्रिकेटची ABCD शिकली. इथं तो मुस्लिम युनायटेड क्लबचे प्रशिक्षक इम्रान सिंह यांच्या संपर्कात आला. प्रशिक्षक इम्रान यांनी सांगितले की जर त्याने सामन्यात कामगिरी केली तर त्याला टेंटमध्ये राहायला मिळेल.

स्वत: यशस्वीने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने पाणीपुरी विकली होती प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी त्याला पहिल्यांदा पाहिले, त्यानंतर ते त्याला उपनगरातील सांताक्रूझ येथील कोचिंग सेंटरमध्ये घेऊन गेले. ऑक्टोबर 2019 मध्ये यशस्वीच्या आयुष्यात एक मोठा यू-टर्न आला. जेव्हा त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 113, 22, 122, 203 आणि नाबाद 60 धावा केल्या होत्या. पुढच्या वर्षी, यशस्वीने दक्षिण आफ्रिकेतील अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत चमकदार फलंदाजी केली, जिथे तो 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरला आणि संघ उपविजेता ठरला.

यशस्वी जैस्वालने भारतासाठी आतापर्यंत 6 कसोटी आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये, यशस्वीने 57.90 च्या सरासरीने 637 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-20 इंटरनॅशनलमध्ये यशस्वीच्या नावावर 33.46 च्या सरासरीने 502 धावांची नोंद आहे. यशस्वीने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Embed widget