On This Day: रोहित शर्मानं आजच्याच दिवशी रचला होता सर्वात मोठा विक्रम, वनडेत तिसरं द्विशतक ठोकून वेधलेलं जगाचं लक्ष
On This Day: क्रिकेटच्या इतिहासात 13 डिसेंबर ही तारीख खूपच खास आहे. भारतीय क्रिकेट आणि हिटमॅन रोहित शर्मासाठीही (Rohit Sharma) हा दिवस विशेष ठरला होता.
On This Day: क्रिकेटच्या इतिहासात 13 डिसेंबर ही तारीख खूपच खास आहे. भारतीय क्रिकेट आणि हिटमॅन रोहित शर्मासाठीही (Rohit Sharma) हा दिवस विशेष आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली आजच्याच दिवशी रोहितनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली होती. त्यानं श्रीलंकेविरुद्ध 208 धावांची खेळी करून त्याच्या कारकिर्दीतील तिसरं एकदिवसीय द्विशतक (Third ODI Double-Century) ठोकलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकणार रोहित शर्मा एकमेव फलंदाज आहे. त्याचा विक्रम आजही कायम आहे.
आयसीसी आणि बीसीसीआयनं रोहितच्या या ऐतिहासिक खेळीचं स्मरण केलंय. रोहितचा फोटो ट्विट करून आयसीसी आणि बीसीसीआयनं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. त्यानं एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरं द्विशतक ठोकून इतिहास रचला होता.
एकदिवसीय क्रिकेटमधील रोहित शर्माची विक्रमीय कामगिरी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकणार रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 नोव्हेंबर 2013 रोजी बेंगळुरूमध्ये 209 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यानं श्रीलंकेविरुद्ध 12 नोव्हेंबर रोजी 264 धावांची तुफानी खेळी केली. तर 13 डिसेंबर 2017 रोजी मोहालीत श्रीलंकेविरुद्ध त्यानं नाबाद 208 धावांची खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर असलेला सर्वाधिक धावांचा विक्रम अबाधित आहे. जगातील कोणत्याच फलंदाजाला हा विक्रम आजपर्यंत तरी मोडता आलेला नाही.
रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार
टी-20 नंतर रोहित शर्माकडं एकदिवसीय संघाचंही नेतृत्व देण्यात आलंय. भारतीय संघाच्या निवड समितीनं याबाबतची घोषणा काही दिवसांपूर्वी केलीय. निवड समितीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. त्याचवेळी एकदिवसीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडं सोपवण्यात आलंय. तसंच कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीही रोहित शर्माची निवड करण्यात आलीय.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Rohit Sharma ODI captain : 'तणाव आहेच, पण माझा फोकस केवळ खेळावर,' कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहितची बेधडक मुलाखात
Yuvraj Singh Birthday : डरबनचे मैदान, युवराजची बॅट अन् इंग्लंडची दाणादाण