Yuvraj Singh Birthday : डरबनचे मैदान, युवराजची बॅट अन् इंग्लंडची दाणादाण
युवराजची अष्टपैलू खेळी आणि त्याची खिलाडू वृत्ती क्रिकेटप्रेमींना भावते. त्यामुळेच भारतात तर त्याचे चाहते आहेतच. परंतु, भारताबाहेरही त्याचे असंख्य चाहते आहेत.
मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या विस्फोटक खेळीने युवराजने नेहमीच चाहत्यांच्या मनात घर केले आहे. सध्या युवराजने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी त्याने गेल्या काही दिवासांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फेब्रुवारी 2022 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं जाहीर केलं आहे. जून 2019 मध्ये युवराज सिंह यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 2007 मधील टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयात युवराजनं सिंहाचा वाटा उचलला होता. याबरोबच एक गोष्ट महत्वाची की कर्करोगावर मात करून आज तो आपले आयुष्य मजेत जगत आहे.
युवराजची अष्टपैलू खेळी आणि त्याची खिलाडू वृत्ती क्रिकेटप्रेमींना भावते. त्यामुळेच भारतात तर त्याचे चाहते आहेतच. परंतु, भारताबाहेरही त्याचे असंख्य चाहते आहेत. युवराज सिंह सर्वात चर्चेत आला तो, 2007 ला झालेल्या आंतराष्ट्रीय टी-20 विश्वकप स्पर्धेपासून. स्पर्धेदरम्यान इंग्लंडविरोधात झालेल्या एका सामन्यात युवराजने सहा चेंडूवर जबरजस्त सहा षटकार खेचले. तेव्हापासून चर्चा फक्त युवराज आणि त्याने खेचलेल्या सहा षटकारांचीच.
महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये टी-20 विश्व कप स्पर्धेसाठी भारतीय संघ आपले नशीब आजमावत होता. भारताने त्यावेळी विश्व कप तर जिंकलाच परंतु, जगभरातील क्रिकेट प्रेमींची मनं सुद्धा जिंकली. पण त्याला कारण ठरला सर्वांचा लाडका युवराज सिंग. तेव्हापासून आतापर्यंत क्रिकेट विश्वात युवराजने सोनेरी अक्षरांनी आपल्या नावे इतिहास रचला.
डरबनचे मैदान, स्टुअर्ट ब्रॉडचे षटक आणि युवराजचे सहा षटकार
भारत आणि इंग्लंडमध्ये 19 डिसेंबर रोजी ग्रृप E साठी खेळल्या गेलेल्या सामन्यात युवराजने ही जबरदस्त कामगिरी केली होती. 17 व्या षटकारानंतर 6 चेंडू आणि 14 धावांवर खेळणाऱ्या युवराजच्या 18 वे षटक संपताना 50 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि स्टुअर्ट ब्रॉण्ड शर्टने आपला घाम पुसत होता.
असे खेचले सहा षटकार
स्टुअर्ट ब्रॉण्ड 18 व्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी आला. पुढे भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज हातात बॅट घेऊन उभा होता. स्टुअर्टने चेंडू टाकला आणि युवराजने तो मैदानाबाहेर 111 मीटर फेकला.
18.2 स्टुअर्टच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर युवराजने परत हल्ला केला. यावेळी चेंडू बैकवर्ड स्क्वायर लेगच्या बाहेर गेला. युवराजच्या नावावर दोन चेंडूत दोन षटकारांची नोंद झाली होती.
18.3 तीसऱ्या चेंडूवर युवराजने परत एक जबरदस्त षटकार खेचला. यावेळी चेंडू एकस्ट्रा कवरसह मैदानाच्या बाहेर.
18.4 युवराजची तूफान खेळी येथेच शांत झाली नव्हती. स्टुअर्टच्या पुढच्या चेंडूवरही युवराज तुटून पडला आणि चेंडू बैकवर्ड पॉइंटच्या बाहेर सहा धावांसाठी फेकला गेला. इंग्लंडचा कर्णधार कॉलिंगवुडने लगेच एक मिटिंग केली.
18.5 यावेळी युवराज गुडघ्यावर बसला. स्टुअर्टच्या चेंडूवर त्याने मिड ऑनच्या परिसरात जबरदस्त षटकार मारला. आता सर्वांच्या नजरा युवराजवर होत्या. अनेकांनी श्वास रोखून धरले होते. प्रत्येक जण विचारात होता की, युवराज आज डबरनच्या मैदानात इतिहास रचणार का?
18.6 आता 18 व्या षटकातील शेवटचा चेंडू होता. परंतु, शेवटचा चेंडू टाकायचा की नाही या विचारात स्टुअर्टची शुद्ध हरपली होती. युवराजने शेवटच्या चेंडूवरही मिड ऑनकडे जोरदार षटकार लगावला. परत एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला आणि युवराजने डबरनच्या मैदानात नव्या इतिहासाची नोंद केली होती.
या सामन्यात युवराजे 12 चेंडूंमध्ये सर्वात जलत फिफ्टी करणारा खेळाडू म्हणून आपल्या नावे एक विक्रम केला. 362.5 च्या स्ट्राइक रेटने 14 चेंडूत 58 धावा करून युवराज बाद झाला.
संबंधित बातम्या
Yuvraj Singh : ‘मी पुन्हा येतोय’! क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची युवराज सिंहची घोषणा
Yuvraj Singh comeback : युवी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर.. जाणून घ्या युवराजचा प्रवास!