एक्स्प्लोर

Virat Kohli : क्रिकेटच्या 'किंग'कडून क्रिकेटच्या देवाची बरोबरी, विराट कोहलीने बर्थ डेच्या दिवशी ठोकले 49 वे वनडे शतक

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर विराट कोहलीने वनडेतील 49 वे शतक ठोकले. विराट कोहलीच्या शतकानंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

Virat Kohli vs Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) वनडेतील शतकांच्या विक्रमाची रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli ) बरोबरी केली आहे.  विराट कोहलीने आफ्रिकेविरोधात शतक ठोकत सचिनच्या वनडेतील शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये 49 शतके ठोकली होती. आता या विक्रमाची विराट कोहलीने आज बरोबरी केली आहे. विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक झळकावले. सचिनच्या वनडे शतकांची बरोबरी केल्यानंतर विराट कोहलीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  विराट कोहलीने अवघ्या 277 डावात 49 वे वनडे शतक ठोकले. सचिन तेंडुलकरला 49 वनडे शतकांसाठी 452 डाव लागले होते.  

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर एके काळी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या फलंदाजाच्या नावावर अनेक मोठे विक्रमही नोंदवले गेले आहेत. पण भारतीय संघाचा सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचा वनडेतील शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीच्या शतकानंतर ईडन गार्डन स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. 

विराट कोहलीचे झंझावती शतक -

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने वादळी सुरुवात करुन दिली. पण एकापाठोपाठ एक दोन धक्के बसल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला.  विराट कोहलीने मैदानावर वर्चस्व गाजवले. विराट कोहलीने  श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने 119 चेंडूमध्ये शतक ठोकले. सुरुवातीच्या षटकात विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. चांगल्या चेंडूला मान देत विराट कोहलीने एकेरी दुहेरी धावसंख्या काढली. त्यानंतर वेगाने धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीत 10 चौकारांचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकरची वनडेमधील कामगिरी -

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. सचिन तेंडुलकरने 452 वनडे डावात 44.8 च्या सरासरीने तब्बल 18 हजार 426 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने 49 शतके ठोकली आहेत. त्याशिवाय 96 अर्धशतकेही लगावली आहेत. यादरम्यान त्याने 195 षटकार आणि 2016 चौकारांचा पाऊस पाडला आहे. सचिन तेंडुलकर वनडेमध्ये 41 वेळा नाबाद राहिला आहे. सचिन तेंडुलकरची वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 200 धावा इतकी आहे.  

Virat Kohli vs Sachin Tendulkar Comparison,  सचिन आणि विराटची नेहमीच तुलना -

 सचिन तेंडुलकरच्या विक्रमांची बरोबरी करणे कोणत्याही खेळाडूला अशक्य आहे, पण अनेक वेळा सध्या खेळणाऱ्या खेळाडूंची तुलना क्रिकेटच्या देवासोबत केली जाते. यामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे, विराट कोहलीचं होय. स्वत: सचिन तेंडुलकरनेही माझा विक्रम विराट कोहली अथवा रोहित शर्मा मोडतील, असं वक्तव्य केले होते. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा आणि शतकांचा पाऊस पडल्यानंतर अनेकांनी त्याची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केली आहे. पण  या दोन दिग्गजांची तुलना करणं कठीण आहे, कारण दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या युगात राहत होते आणि दोघांच्या काळात क्रिकेटचा खेळ सारखा नव्हता. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL Rules Update BCCI : हार्दिक-अर्शदीप गर्लफ्रेंडसोबत दिसले अन् BCCIचा पारा चढला! नव्या नियमांनी खेळाडू अन् फ्रँचायझींची झोप उडाली, जाणून घ्या प्रकरण
हार्दिक-अर्शदीप गर्लफ्रेंडसोबत दिसले अन् BCCIचा पारा चढला! नव्या नियमांनी खेळाडू अन् फ्रँचायझींची झोप उडाली, जाणून घ्या प्रकरण
Prince Yadav on Virat Kohli : आयपीएलमधील सर्वात मोठा ट्विस्ट! विराटचीच टिप वापरून प्रिन्सने घेतला 'किंग'चा विकेट, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?
आयपीएलमधील सर्वात मोठा ट्विस्ट! विराटचीच टिप वापरून प्रिन्सने घेतला 'किंग'चा विकेट, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?
IPL 2026 Points Table : आरसीबीला पराभवाचा मोठा धक्का, पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ! मुंबई इंडियन्सचे चान्सेस वाढले? जाणून घ्या गणित
आरसीबीला पराभवाचा मोठा धक्का, पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ! मुंबई इंडियन्सचे चान्सेस वाढले? जाणून घ्या गणित
LSG vs RCB IPL 2026 : गोलंदाज हट्टावर, कर्णधाराचा मोठा निर्णय! पंतच्या 'त्या' एका मास्टर स्ट्रोकमुळे मध्यरात्री मॅचचा निकालच बदलला; नेमकं काय घडलं?
गोलंदाज हट्टावर, कर्णधाराचा मोठा निर्णय! पंतच्या 'त्या' एका मास्टर स्ट्रोकमुळे मध्यरात्री मॅचचा निकालच बदलला; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Sarke Chunar Song Controversy Nora Fatehi Apologize: 'आता आयटम साँग करणारच नाही...'; 'सरके चुनर' गाण्याच्या वादावर नोरा फतेहीचा माफीनामा, 100 अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
'आता आयटम साँग करणारच नाही...'; 'सरके चुनर' गाण्याच्या वादावर नोरा फतेहीचा माफीनामा, 100 अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
SSC Exam Result 2026 : दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार;  वाचा A टू Z माहिती
दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार; वाचा A टू Z माहिती
Embed widget