एक्स्प्लोर

Breaking : पाकिस्तान संघाला अद्याप मिळाला नाही व्हिसा, बाबरच्या विश्वचषक प्लॅनिंगवर फिरणार पाणी

Pakistan Team : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.

ODI World cup 2023, Pakistan Team : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. क्रिकेटचा सर्वात मोठा महासंग्राम  5 ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे. या मेगा इव्हेंटआधी २९ सप्टेंबरपासून सराव सामने होणार आहेत. प्रत्येक संघाला दोन दोन सराव सामने खेळायला मिळणार आहेत. त्यासाठी प्रत्येक संघ एक आठवडा आधीच भारतात दाखल होऊ शकतो.  भारताचा शेजारी पाकिस्तान संघातील खेळाडूंना अद्याप व्हिसा मिळालेला नाही. व्हिसा न मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले जाऊ शकते.  

यंदाचा वनडे विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जाणार आहे. टीम इंडियासह दहा संघ यामध्ये सहभागी होणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतात पाकिस्तानला अद्याप भारतात येण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही. पाकिस्तान वगळता इतर अठ संघांना भारतात येण्यास व्हिसा मिळाला आहे. 
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, विश्वचषकासाठी भारतात रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानने दुबईत सराव करण्याची योजना आखली होती. यानंतर ते तेथून थेट हैदराबादला पोहचणार होते.  मात्र व्हिसा न मिळाल्याने त्यांचा प्लॅन फिस्कटला आहे. 

आठवड्याभरापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. पण अद्याप त्यांना व्हिसा मिळाला नाही. आता पाकिस्तान संघ २७ सप्टेंबरला दुबईला रवाना होईल आणि त्यानंतर तेथून भारतात येईल. व्हिसाला झालेल्या विलंबाबाबत पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाने संयमी भूमिका घेतली आहे.  निर्धारित वेळेत व्हिसा मिळेल, अशी आशा पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. पाकिस्तान संघाला २९ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे न्यूझीलंडविरोधात सराव सामना खेळायचा आहे. 

नसीम शाह आऊट, हसन अली याला संधी 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी १५ शिलेदारांची घोषणा केली आहे. २२ सप्टेंबर रोजी पीसीबीने ट्वीट करत खेळाडूंची नावे जाहीर केली. दुखापतीमुळे नसीम शाह याला विश्वचषकात खेळता येणार नाही. त्याच्याजाही असन अली याला संधी देण्यात आली आहे. नसीम शाह याला आशिया चषकात दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेलाय.  शादाब खान, मोहम्मद नवाज आणि उसामा मीर या तीन फिरकी गोलंदाजांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पाकिस्तानी संघ :

बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, सलमान आगा, शादाब खान (उप-कर्णधार), मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, सऊद शकील, हॅरिस रौफ.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Heatwave In March : मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Ajit Pawar : स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Commissioner Amitesh Kumar PC : नराधम दत्ता गाडे कसा सापडला? पुणे पोलिसांची UNCUT PCABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 February 2025Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखलABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 28 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Heatwave In March : मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Ajit Pawar : स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
Nilam Shinde Accident : अमेरिकेत मुलीची मृत्यूशी झुंज! मंत्र्यांचे उंबरठे झिजवणाऱ्या बापाला 14 दिवसांनी मिळाला व्हिसा, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
अमेरिकेत मुलीची मृत्यूशी झुंज! मंत्र्यांचे उंबरठे झिजवणाऱ्या बापाला 14 दिवसांनी मिळाला व्हिसा, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
Rajaram Sakhar Karkhana : राजाराम कारखान्याच्या बाॅयलरला भीषण आग,  आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या बाॅयलरला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Ashish Shelar : ठाकरेंच्या हाती सभेत दाखवण्यासाठी रुद्राक्षांची माळ, तोंडी औरंगजेबाचाच जप; आशिष शेलारांचा प्रहार; 'छावा'वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी...
ठाकरेंच्या हाती सभेत दाखवण्यासाठी रुद्राक्षांची माळ, तोंडी औरंगजेबाचाच जप; आशिष शेलारांचा प्रहार; 'छावा'वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी...
TCS  Manager Manav Sharma : TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं, म्हणाला, मी बायकोच्या छळाला कंटाळलो; पुरुषांचा विचार करा, ते खूप एकाकी आहेत
TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं, म्हणाला, मी बायकोच्या छळाला कंटाळलो; पुरुषांचा विचार करा, ते खूप एकाकी आहेत
Embed widget