एक्स्प्लोर

भारताचा सिराज, पाकिस्तानचा बाबर...यंदा विश्वचषकात कोणाचा बोलबाला? सहभागी संघांमधील टॉप रँकर्स कोण?

ODI Player Rankings : आयसीसी क्रमवारीत फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलूमध्ये दहा संघातील कोणते खेळाडू अव्वल आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात.. 

ODI Player Rankings : विश्वचषकाच्या रनसंग्रामाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान दहा संघामध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. प्रत्येक संघ कमीत कमी नऊ सामने खेळणार आहे. 150 पेक्षा जास्त खेळाडू दीड महिना नशीब अजमावणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषकाचा विजेता मिळाले. या विश्वचषकात अनेक दिग्गजांच्या कामगिरीकडे नजरा असतील. प्रत्येक संघातील आघाडीच्या खेळाडूबद्दल जाणून घेऊयात.. आयसीसी क्रमवारीत फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलूमध्ये दहा संघातील कोणते खेळाडू अव्वल आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात.. 

अफगाणिस्तान  Afghanistan 

आघाडीचा फलंदाज - इब्राहीम जरदन (आयसीसी क्रमवारी 18)
आघाडीचा गोलंदाज - मुजीब रहमान (आयसीसी क्रमवारी 03)
आघाडीचा अष्टपैलू - मोहम्मद नबी (आयसीसी क्रमवारी 2)

आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये आघाडीच्या तीन खेळाडूमध्ये अफगाणिस्तानचे दोन खेळाडू आहेत. माजी कर्णधार मोहम्मद नबी अष्टपैलू खेळाडूमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजीत मुजीब तिसऱ्या स्थानावर आहे. राशीद खान चौथ्या क्रमांकावर आहे. युवा फलंदाज इब्राहिम जरदन फलंदाजीच्या क्रमवारीत 18 व्या स्थानावर आहे. 

बांगलादेश Bangladesh

आघाडीचा फलंदाज मुशफिकुर रहमान- (आयसीसी क्रमवारी 21 )
आघाडीचा गोलंदाज शाकीब अल हसन- (आयसीसी क्रमवारी 17)
आघाडीचा अष्टपैलू शाकीब अल हसन- (आयसीसी क्रमवारी 1 )

शाकीब अल हसन बांगलादेशसाठी पाचवा विश्वचषक खेळत आहे. बांगलादेशचा कर्णधार अष्टपैलू खेळाडूमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. शाकीब अल हसन 2007, 2011, 2015 आणि 2019 मध्ये बांगलादेशच्या विश्वचषक संघाचा भाग होता. सध्या तो अव्वल स्थानावर आहे. त्याच्याकडून बांगलादेशला मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल.  बांगलादेशसाठी मुशपिकुर रहमान सध्या आयसीसीच्या 21  व्या क्रमांकावर आहे. 

इंग्लंड England

आघाडीचा फलंदाज डेविड मलान(आयसीसी क्रमवारी 14)
आघाडीचा गोलंदाज ख्रिस वोक्स (आयसीसी क्रमवारी 12)
आघाडीचा अष्टपैलू ख्रिस वोक्स (आयसीसी क्रमवारी 11)

गतविजेत्या इंग्लंडचा एकही फलंदाज अथवा गोलंदाज आयसीसीच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये नाही. फलंदाजीत डेविड मलान 14 व्या क्रमांकावर आहे. तर कर्णधार जोस बटलर फलंदाजीत 17 व्या स्थानावर आहे. ख्रिस वोक्स गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूमध्ये इंग्लंडसाठी आघाडीचा खेळाडू आहे. गोलंदाजीत ख्रिस वोक्स 12 तर अष्टपैलू खेळाडूमध्ये 11 व्या क्रमांकावर आहे. 

इंडिया India 

आघाडीचा फलंदाज शुभमन गिल (आयसीसी क्रमवारी 2 )
आघाडीचा गोलंदाज मोहम्मद सिराज (आयसीसी क्रमवारी 1)
आघाडीचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (आयसीसी क्रमवारी 7)

गोलंदाज, फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये एकतरी खेळाडू असणारा भारत एकमेव देश आहे. फलंदाजीत शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज पहिल्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या सातव्या स्थानावर विराजमान आहे. विश्वचषकादरम्यान शुभमन गिल फलंदाजीत पहिल्या स्थानावर पोहचू शकतो. शुभमन गिल आणि बाबर आझम यांच्यामध्ये फक्त दहा गुणांचा फरक आहे. फलंदाजीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा टॉप 10 मध्ये विराजमान आहेत. तर गोलंदाजीत कुलदीप यादव टॉप 10 मध्ये आहे. 

न्यूझीलंड New Zealand 
 
आघाडीचा फलंदाज केन विल्यमसन (आयसीसी क्रमवारी 23)
आघाडीचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट (आयसीसी क्रमवारी 05 )
आघाडीचा अष्टपैलू मिचेल सँटनर(आयसीसी क्रमवारी 11)

पाकिस्तानचा कर्णधार केन विल्यमसन फलंदाजीत 23 व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा एकही फलंदाज आघाडीच्या दहा खेळाडूमध्ये नाही. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट अव्वल आहे. बोल्ट गोलंदाजीच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये मिचेल सँटनर 11 व्या क्रमांकावर आहे. 

पाकिस्तान Pakistan

आघाडीचा फलंदाज बाबर आझम (आयसीसी क्रमवारी 1 )
आघाडीचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी (आयसीसी क्रमवारी 8 )
आघाडीचा अष्टपैलू शादाब खान(आयसीसी क्रमवारी 13)

पाकिस्तानला विश्वचषकाच्या दावेदार संघापैकी एक म्हटलेय जाते. फलंदाजीत बाबर आझम अव्वल स्थानावर विराजमान आहे. मोहम्मद रिझवान आणि इमाम उल हक आघाडीच्या दहा फलंदाजामध्ये आहेत. गोलंदाजीमध्ये शाहीन आफ्रिदी आठव्या स्थानावर विराजमान आहे. तर अष्टपैलू खेळाडूमध्ये शादाब खान 13 व्या स्थानावर आहे. 

दक्षिण आफ्रिका South Africa

आघाडीचा फलंदाज रासी वॅन डर डुसेन (आयसीसी क्रमवारी 3)
आघाडीचा गोलंदाज केशव महाराज (आयसीसी क्रमवारी 14)
आघाडीचा अष्टपैलू एडन मार्करम (आयसीसी क्रमवारी 23)

मध्यक्रमचा आघाडीचा फलंदाज रासी वॅन डुसेन आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आणि गिल यांच्यानंतर तो आघाडीवर आहे. विश्वचषकात त्याच्याकडून आफ्रिकेला मोठ्या कामगिरीची आपेक्षा असेल. केशव महाराज गोलंदाजीत 14 व्या स्थानावर आहे तर अष्टपैलूमध्ये एडन मार्करम 23 व्या स्थानावर आहे. 

श्रीलंका Sri Lanka 

आघाडीचा फलंदाज चरीथ असलंका (आयसीसी क्रमवारी 27)
आघाडीचा गोलंदाज महीश तिक्ष्णा(आयसीसी क्रमवारी 16)
आघाडीचा अष्टपैलू धनंजय डी सिल्वा (आयसीसी क्रमवारी 17)

Netherlands 

आघाडीचा फलंदाज स्कॉट एडवर्ड्स (आयसीसी क्रमवारी 39 )
आघाडीचा गोलंदाज  लोगन वॅन बीक (आयसीसी क्रमवारी 51)
आघाडीचा अष्टपैलू बॅस डे लीडे(आयसीसी क्रमवारी 49)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget