एक्स्प्लोर

इथं विराट कोहलीनं विकेट घेतला अन् तिथं अनुष्कानं केलं असं काही; VIDEO होतोय व्हायरल

ICC world cup 2023 : विश्वचषक 2023 मध्ये नेदरलँड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात विराट कोहलीनं गोलंदाजी करताना विकेट घेतली, ज्यावर अनुष्कानं दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Anushka Sharma's Reaction: टीम इंडिया (Team India) आणि नेदरलँड्स (Netherlands) विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या 9 खेळाडूंनी गोलंदाजी केली. टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजांसोबतच, धुवाधार फलंदाजांनीही फलंदाजी करत नेदरलँड्सच्या फलदांजांचा धुव्वा उडवला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट, तर विराट कोहली आणि रोहित शर्मानं प्रत्येकी एक विकेट घेतला. दरम्यान, नेदरलँड्सविरुद्धचा सामना जिंकत टीम इंडियानं यंदाच्या विश्वचषकात सलग नववा सामना आपल्या नावे केला. विश्वचषकाच्या सामन्यात सर्वांच्या कायम लक्षात राहील ते म्हणजे, विराट कोहली आणि रोहित शर्मानं घेतलेल्या विकेट्स. 

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्सच्या सामन्यात 9 खेळाडूंनी गोलंदाजी केली. महत्त्वाचं म्हणजे, टीम इंडियाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा कणा असलेल्या विराट कोहली कालच्या सामन्यात गोलंदाजी करताना दिसला. रोहित शर्मानं नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी करताना शेवटची विकेट घेत नेदरलँड्सचं आव्हान संपृष्टात आणलं. 11 वर्षांनंतर रोहित शर्मानं गोलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेट घेतला. तर, "विराट कोहली को बॉलिंग दो", ही चाहत्यांची मागणी मान्य करत रोहितनं विराट कोहलीला गोलंदाजी दिली. विराटनंही रोहितचा मान ठेवत गोलंदाजी केली आणि चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं. कोहलीनं विकेट घेतली. तब्बल 9 वर्षानंतर विराटनं आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेट घेतली. विकेट घेतल्यानंतर विराटसह संपूर्ण टीम इंडियानं मैदानातच सेलिब्रेशन केलं. पण, विराटनं विकेट चटकावताच स्टेडियमधील प्रेक्षक गॅलरीत बसलेली अनुष्काही आनंदानं बहरून गेली. विराटनं विकेट घेतल्यानंतर पत्नी अनुष्कानं जोरदार सेलिब्रेशन केलं.  

View this post on Instagram
 
A post shared by ICC (@icc)

अनुष्काचं जोरदार सेलिब्रेशन 

विराट कोहली विश्वचषक 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजी करताना दिसला होता. चाहत्यांची मागणी पूर्ण करत रोहित शर्माने चेंडू कोहलीच्या हातात दिला. यापूर्वी स्टँडवर बसलेले चाहते कोहलीला गोलंदाजी करण्याची विनंती करत होते. रोहित शर्माच्या विश्वासावर खरं उतरत कोहलीनं दुसऱ्याच षटकात विकेट घेतली. कोहलीनं घेतलेल्या विकेटनंतर पत्नी अनुष्का शर्मानं केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कोहलीची विकेट घेताच अनुष्का शर्मा आनंदानं बहरून गेली. सामन्याच्या 25व्या षटकात कोहलीनं नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डसला बाद केलं. इथं मैदानात विराटनं विकेट घेतला आणि पत्नी अनुष्काच्या आनंदाला पारावार उरला नाही. पवेलियनमध्ये बसलेली अनुष्काच्या चेहऱ्यावर तिचा आनंद झळकत होता. तिच्या याच रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील पाचवा विकेट 

विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हा पाचवा विकेट होता. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-20 मध्येही त्यानं 4 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच, कोहलीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हा नववा आंतरराष्ट्रीय विकेट होता. कोहलीनं 9 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेतला. या स्पर्धेच्या आधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीनं हार्दिक पांड्याच्या षटकातील उरलेले तीन चेंडू टाकले होते, त्यानंतरच्या सामन्यांपासूनच चाहते सातत्यानं "विराट कोहली को बॉलिंग दो" अशी विनंती रोहितकडे करत होते. कालच्या सामन्यात रोहित शर्मानं चाहत्यांची मागणी पूर्ण करत कोहलीला बॉलिंग दिली. 

विश्वचषक 2023 मधील सलग नववा विजय 

रोहित शर्माच्या भारतीय संघानं नऊपैकी नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवून, विश्वचषकाच्या साखळीत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला. भारतानं अखेरच्या साखळी सामन्यात तर नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल्सच्या सामन्यासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Embed widget