T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; चौकार-षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या खेळाडूला दुखापत
T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक असताना पाकिस्तानच्या संघाच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आलीय.
T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक असताना पाकिस्तानच्या संघाच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आलीय. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या त्रिकोणीय टी-20 मालिकेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज आसिफ अलीला (Asif Ali) दुखापत झालीय. चौकार रोखण्याच्या प्रयत्नात आसिफला दुखापत झालीय. ज्यामुळं त्याला मैदानाबाहेर पडावं लागलं होतं.
आसिफच्या दुखापतीमुळं पाकिस्तानच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता
दरम्यान, फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या आसिफला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्यानं दोन चेंडूत एक धाव करून माघारी परतला. महत्वाचं म्हणजे, त्याची दुखापत किती गंभीर आहे? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. आसिफ अलीची दुखापत पाकिस्तानच्या संघाच्या चिंतेत भर घालण्याची शक्यता आहे.
पाकिस्ताननं त्रिकोणीय टी-20 मालिका जिंकली
न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत खेळल्या गेलेल्या या त्रिकोणीय टी-20 मालिकेचं विजेतेपद पाकिस्ताननं पटकावलं. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पाच विकेट्स पराभव केला. आगामी टी-20 विश्वचषकात पाकिस्तान त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारताशी खेळणार आहे. यापूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंडशी 17 ऑक्टोबर आणि अफगाणिस्तानशी 19 ऑक्टोबरला सराव सामना खेळणार आहे.
ट्वीट-
Sealed with a six! 👏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 14, 2022
Pakistan win the #NZTriSeries final by five wickets 🙌#PAKvNZ pic.twitter.com/5Ga5tPhdme
ट्वीट-
TRI-SERIES WINNERS 🏆#PAKvNZ | #NZTriSeries pic.twitter.com/uLLkpGjkC4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 14, 2022
शाहीन आफ्रिदीचं संघात पुनरागमन
त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी फिट झालाय. ही पाकिस्तानसाठी दिलासादायक बाब आहे. पहिल्या सराव सामन्यापासून आफ्रिदी पाकिस्तानसाठी उपलब्ध होणार आहे. आफ्रिदी तीन महिन्यांहून अधिक काळ एकही सामना खेळलेला नाही.
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद.
हे देखील वाचा-