AUS vs ENG 2022: ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात नमवलं, इंग्लंडनं 2-0 नं टी-20 मालिका जिंकली!
या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला (Jos Buttler) मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
England Tour Of Australia: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (England vs Australia 3rd T2o Match) तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना पावसामुळं पूर्ण होऊ शकला नाही. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून 2-0 अशी आघाडी घेणाऱ्या इंग्लंडच्या संघाला मालिका विजयी म्हणून घोषित करण्यात आलं. या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला (Jos Buttler) मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हल स्टेडियमवर (Manuka Oval) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघानं 12 षटकात दोन विकेट्स गमावून 112 धावा केल्या. पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात डेकवर्थ लुईसच्या नियमांर्गत ऑस्ट्रेलियासमोर 12 षटकात 130 धावाचं लक्ष्य ठेवण्यात आलं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघानं 3.5 षटकात तीन विकेट्स गमावून 30 धावा केल्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. ज्यामुळं पुढील खेळ होऊ शकला नाही.
ट्वीट-
Match abandoned in Canberra.
— England Cricket (@englandcricket) October 14, 2022
We win the series 2-0!
🇦🇺 #AUSvENG 🏴 pic.twitter.com/wU95GcMkVd
जोस बटलरची धमाकेदार खेळी
या सामन्यात जोस बटलरनं इंग्लंडकडून सर्वाधिक नाबाद 65 धावांची खेळी केली. याशिवाय डेव्हिड मलाननं 19 चेंडूत 23 धावांचं योगदान दिलं. बेन स्टोक्सने 10 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी एक-एक विकेटस् मिळाली. इंग्लंडच्या 130 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पावसामुळं खेळ थांबला, तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाच्या 3.5 षटकात 30 धावा करून तीन खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
ख्रिस वोक्सची घातक गोलंदाजी
या सामन्यात आरोन फिंच पूर्णपणे अपयशी ठरला. आरोन फिंच एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला.ख्रिस वोक्सच्या भेदक गोलंदाजीसमोर आरोन फिंचनं गुडघे टेकले. ख्रिस वोक्सनं आरोन फिंचनंतर सलामीला आलेल्या तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला स्वस्तात माघारी धाडलं.ग्लेन मॅक्सवेलनं नऊ चेंडूत आठ धावा केल्या. त्यानंतर मिचेश मार्शही ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला.या सामन्यात ख्रिस वोक्सनं दोन षटकात चार धावा देत तीन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-