Niroshan Dickwella Banned : क्रिकेट विश्वात उडाली खळबळ! डोपिंगमध्ये अडकला कर्णधार, सर्व फॉरमॅटमधून लागली बंदी
श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Niroshan Dickwella Banned News : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका क्रिकेटमधून मोठी बातमी येत आहे. डोपिंग टेस्ट अपयशी ठरल्यानंतर श्रीलंकेच्या एका स्टार निरोशन डिकवेलावर क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावर सर्व फॉरमॅटमधून बंदी घालण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लंका प्रीमियर लीगदरम्यान डोपिंगविरोधी उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
बंदी किती काळ राहणार?
एलपीएलमध्ये डोपिंग टेस्ट अपयशी ठरल्यामुळे बंदी घालण्यात आलेल्या निरोशन डिकवेलावर बंदी किती काळ राहणार याची अधिकृत घोषणा श्रीलंका क्रिकेट बोर्ड करणार आहे. निरोशन डिकवेला लंका प्रीमियर लीग 2024 मध्ये गॅले मार्व्हल्सचे नेतृत्व करत होता आणि त्याने 10 डावात 184 धावा केल्या होत्या. संघाला अंतिम फेरीत जाफना किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. अंतिम फेरीत 8 चेंडूत केवळ 5 धावा करून तो आऊट बाद झाला.
Sri Lanka Cricketer Niroshan Dickwella suspended for Anti-Doping Violation https://t.co/DKuDdjUdpj
— NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) August 16, 2024
वादांशी जुना संबंध
31 वर्षीय या क्रिकेटपटूचा दीर्घकाळ वादांशी संबंध आहे. 2021 च्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये बायो-बबल उल्लंघनामुळे दानुष्का गुनाथिलका आणि कुसल मेंडिससह त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तो बराच काळ श्रीलंका संघांचा भाग नव्हता. त्याने मार्च 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली आणि जून 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे म्हणून पांढऱ्या चेंडूचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 21 जून 2021 रोजी, त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20I सामना खेळला.
निरोशन डिकवेलाची कारकीर्द
निरोशन डेकवेलाने श्रीलंकेसाठी 54 कसोटी, 55 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2757 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 1604 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये त्याने 480 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 शतके आहेत.
ही बातमी वाचा :